R Ashwin Choose All Time Best Playing 11 For IPL : टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर गोलंदाज आर अश्विन याने वर्ल्ड क्रिकेटमधून एकापेक्षा एक अनुभवी खेळाडूंची निवड करून आयपीएलची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 सांगितली आहे. आर अश्विनने आयपीएलच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. तर महत्वाची गोष्ट ही की आर अश्विनने आयपीएलच्या बेस्ट प्लेईंग 11 चे कर्णधारपद भारतीय खेळाडूकडे सोपवले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आर अश्विनने आयपीएलची बेस्ट प्लेईंग 11 जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली धोनीने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर रोहित शर्माने सुद्धा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत असताना 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. मात्र अश्विनने आयपीएलच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 चा कर्णधार म्हणून धोनीची निवड केली आहे.  


आयपीएलच्या ऑल टाइम बेस्ट Playing 11 मध्ये एकापेक्षा एक खेळाडू : 


आर अश्विनने आयपीएलची ऑल टाइम बेस्ट Playing 11 निवडताना ओपनिंग बॅट्समन म्हणून रोहित शर्माला स्थान दिले आहे. तर रोहित सोबत ओपनिंग फलंदाज म्हणून विराट कोहलीची निवड केली आहे. रविचंद्रन अश्विनने सुरेश रैनाला नंबर तीन तर सूर्यकुमार यादवला नंबर चारवर फलंदाजी करण्यासाठी निवडलं आहे. आर अश्विनने साऊथ आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स याला नंबर 5 चा फलंदाज म्हणून निवडलं आहे. महेंद्र सिंह धोनीला विकेटकिपर फलंदाज म्हणून अश्विनने नंबर 6 वर स्थान दिलं आहे. तर नंबर 7 वर अफगणितस्थानचा ऑल राउंडर खेळाडू राशिद खान याला संधी दिली आहे. तर वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर सुनील नरेन याला नंबर 8 वर ठेवलंय. तर अश्विनने वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड केली आहे. 


हेही वाचा : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, युवा खेळाडूंना संधी.. 'या' तारखेला भारत-पाक भिडणार


 


अश्विनची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 टीम : 


रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), राशिद खान, सुनील नरेन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा


दिनेश कार्तिकने निवडलेल्या प्लेईंग 11 मुळे झाला होता वाद : 


भारताचा माजी विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएल 2024 नंतर क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली. दिनेश कार्तिकने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 सांगितली. मात्र या दरम्यान त्याने भारताचा तब्बल तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या एम एस धोनीची निवड केली नव्हती. यामुळे धोनीचे फॅन्स दिनेशवर नाराज झाले होते आणि त्याला सोशल मीडियावर ट्रॉलही करण्यात आले. नंतर दिनेश कार्तिकने क्रिकबझच्या शोमध्ये धोनीच्या फॅन्सची माफी मागितली आणि तो धोनीला ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये निवडायचं विसरला हे कबूल केले.