चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात रविचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकलं. अश्विनने त्याच्या टेस्ट करिअरमधील पाचवं शतक ठोकलं. सोबतच त्याने टीका करणाऱ्या लोकांना ही उत्तर दिलं. रविचंद्रन अश्विनसाठी शतक ठोकणं इतकं सोपं नव्हतं. कारण टीम इंडियाचे चांगले चांगले बॅट्समन या पीचवर टीकू शकले नाही. इशांत शर्माची विकेट 237 रनवर पडल्यानंतर दहाव्या विकेटसाठी अश्विनने शानदार कामगिरी केली. चैन्नईच्या क्रिकेट चाहत्यांना त्याने निराश केलं नाही. त्याने त्याच्या होम ग्राऊंडवर शतक ठोकत त्याच्या चाहत्यांना ही खूश केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद सिराज जेव्हा 10 व्या स्थानावर आला तेव्हा अश्विन 77 रनवर खेळत होता. मोहम्मद सिराजने देखील रविचंद्रन अश्विनला चांगली साथ दिली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. अश्विनने जेव्हा शतक ठोकलं तेव्हा सिराजला देखील खूप आनंद झाला. जो त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.


रविचंद्रन अश्विनने शतक पूर्ण करताच चेन्नईच्या मैदानाता एकच जल्लोष झाला. अश्विनने देखील संपूर्ण प्रेक्षकांचं अभिवादन केलं. टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 286 रनवर ऑलआउट झाली. इंग्लंडला विजयासाठी 482 रनची आवश्यकता आहे.