स्मिथच्या रडण्यावर बोलला आर अश्विन
टीम इंडियाचा स्टार स्पिनर आर. अश्विनने बॉल टँपरिंग प्रकरणात सापडलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरचं समर्थन केलं आहे. त्याने म्हटलं की, जग फक्त तुम्हाला रडवतो. एकदा का तुम्ही रडले तर ते संतुष्ट होऊन जातात आणि त्यानंतर आनंदी राहतात.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार स्पिनर आर. अश्विनने बॉल टँपरिंग प्रकरणात सापडलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरचं समर्थन केलं आहे. त्याने म्हटलं की, जग फक्त तुम्हाला रडवतो. एकदा का तुम्ही रडले तर ते संतुष्ट होऊन जातात आणि त्यानंतर आनंदी राहतात.
अश्विनने ट्विट केलं की, 'जग फक्त तुम्हासला रडतांना पाहू इच्छितो. सांत्वन हा फक्त शब्द नाही आहे. आता ही लोकांमध्ये ही सहानुभूती आहे. देव स्टीव स्मिथ आणि बेनक्रॉफ्टला यातून बाहेर पडण्यासाठी ताकद देवो.
अश्विनने ट्विट केलं की, 'डेविड वॉर्नला देखील यातून बाहेर पडण्यासाठी ताकद देवो. आशा आहे की, त्यांचा संघ त्यांचं समर्थन करेल. स्टीव स्मिथने गुरुवारी सिडनीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्याला अश्रृ अनावर झाले. स्मिथ आफ्रिकेहून ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर ५ मिनिटं प्रेस कांफ्रेंसमध्ये रडत होता.