IPL लिलावात धोनीच्या सीएसकेचा मास्टरस्ट्रोक! `या` भावी कॅप्टनला केलं स्वस्तात खरेदी
IPL 2024 Auction Rachin Ravindra: वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्र याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलं आहे.
IPL 2024 Auction Rachin Ravindra: सध्या दुबईत सुरू असलेल्या लिलावात (IPL auction 2024) अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली आहे. भारताविरुद्ध धमाकेदार खेळी करणारा न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रविंद्र (Rachin ravindra) याला चेन्नई सुपर किंग्जने (CSK) संघात सामावून घेतलं आहे. 50 लाख मूळ किंमत असणाऱ्या रचिनला सीएसकेने 1.80 लाख किमतीत संघात घेतलंय. त्यामुळे आता चेन्नईच्या संघात एका नव्या युवा खेळाडूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता थाला धोनीने भावी कर्णधाराला संघात घेतलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
रचिन रवींद्रने त्याची मूळ किंमत फक्त 50 लाख रुपये ठेवली होती. त्याचे नाव पुकारल्यावर दोन ते तीन संघ त्याच्यावर बोली लावू लागले. दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज मैदानात होते. त्याची बोली 50 लाख रुपयांपासून सुरू झाली आणि अल्पावधीतच 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, अखेर सीएसकेने रचिन रवींद्रला 1 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केलं. एवढ्या कमी किमतीत रवींद्र विकला जाईल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
शार्दूलची घरवापसी
मराठमोळ्या शार्दूल ठाकुर याची घरवापसी झाली आहे. दुबईत सुरु असलेल्या आयपीएल ऑक्शन 2024 मधून चेन्नई सुपर किंग्स टीमने शार्दुल ठाकुर याला खरेदी केलं. त्याला बेस प्राईजच्या दुप्पट रक्कमेत खरेदी केलंय. चेन्नईने शार्दुलला 4 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
डॅरेल मिचेलसाठी सीएसकेने 14 कोटी मोजले आहेत. डॅरेल मिचेल याची बेस प्राईज ही 1 कोटी होती. त्याला घेण्यासाठी पंजाब आणि दिल्लीने बोली लगावली. अखेर त्याला चेन्नईने 14 कोटी रूपयांन आपल्या संघात घेतलं आहे.