Radha Yadav Catch Viral Video: भारत आणि न्यूझीलंड महिला संघादरम्यान (IND W vs NZ W) 27 ऑक्टोबर रोजी  3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारतीय संघातील राधा यादवने सिद्ध केले केले की ती टीम इंडियातील सर्वात हुशार क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.  याचे कारण असे की न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात राधा यादवने सुपरमॅनप्रमाणे उत्कृष्ट झेल घेतला. राधाने 31.3 व्या चेंडूवर हा अप्रतिम झेल घेतला. जमिनीपासून 2 फुटांवर घेतलेला हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


हवेत उडी मारून राधा यादवचा दमदार झेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधा यादवच्या या अप्रतिम झेलचा हा एक्स या सोशल मीडिया हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंड नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी 31.3 षटकात प्रिया मिश्राच्या चेंडूवर राधा यादवने अप्रतिम झेल घेतला. ब्रुक हॅलिडेने मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला. पण चेंडू तिच्या बॅटला नीट लागला गेला नाही. यादरम्यान राधा यादवने मागे धावत सुपरमॅन स्टाईलमध्ये कॅच घेतला. आता राधा यादवचा हा झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. प्रिया मिश्राचा ही डेब्यू मॅच आहे आणि ही तिची पहिली विकेट होती, जी राधा यादवने तिच्या शानदार क्षेत्ररक्षणाने खूप खास बनवली.



राधाने  गोलंदाजीतही केली कमाल 


उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासोबतच राधा यादवनेही उत्कृष्ट गोलंदाजी केली. तिने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 69 धावा देऊन 4 बळी घेतले. या काळात तीने 6.90 च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या. याशिवाय भारताकडून पदार्पण करणाऱ्या प्रिया मिश्राने 10 षटकात 49 धावा दिल्या आणि 1 बळी आपल्या नावावर केला. तर दीप्ती शर्माला 2 विकेट्सचे यश मिळाले. 


 



राधा यादवचा अष्टपैलू खेळ


108 धावांत आठ गडी गमावून भारतीय संघ लाजिरवाणा पराभवाकडे वाटचाल करत होता, मात्र राधा यादव आणि सायमा ठाकोर (29) यांनी  केलेल्या 70 धावांच्या भागीदारीने संघाला मोठ्या फरकाने पराभवापासून वाचवले. 


न्यूझीलंडने ७६ धावांनी केला भारताचा पराभव 


न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनच्या अष्टपैलू खेळामुळे न्यूझीलंडने रविवारी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या महिला वनडेत भारताचा 76 धावांनी पराभव करत शानदार पुनरागमन केले. 86 चेंडूत 79 धावांची शानदार खेळी केल्यानंतर डेव्हाईननेही 27 धावांत तीन बळी घेतले. राधा यादवने चार विकेट घेत भारताकडून ४८ धावा केल्या, पण तिचे प्रयत्न संघासाठी अपुरे ठरले.