मुंबई : भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू पुजारा आणि रहाणे खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर झाले आहेत. यंदा भारतीय संघाला अनेक मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. ज्यासाठी या खेळाडूंचा पर्याय शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पुजारा आणि रहाणे हे मधल्या फळीतील सर्वात मजबूत दुवे मानले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कौशल्याच्या जोरावर संघाला संकटातून बाहेर काढण्याची ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही खेळाडूंची बॅट शांत होती. त्यामुळे बीसीसीआयने त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. पुजारा आणि रहाणेच्या जागी कोणाला टीम इंडियात संधी मिळू शकते.


पुजारा आणि रहाणेच्या जागी दमदार फलंदाज केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. या युवा फलंदाजाने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. केएल राहुलही संघासाठी सलामी आणि मधल्या फळीत खेळताना दिसला आहे. जिथे त्याला धावा करण्यात कोणतीही अडचण येत नाही.


अशा परिस्थितीत त्यांच्या कामगिरीत कोणतीही घसरण झालेली नाही. राहुल दीर्घकाळापासून टीम इंडियाचा भाग आहे. आता तो भारतीय फलंदाजी क्रमवारीत आपला दावा ठामपणे मांडतो आहे. रोहित शर्मासह राहुल डावाची सुरुवात करताना दिसत आहे. पण फलंदाजीची जुळवाजुळव पाहता राहुलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जावू शकते.


राहुल हा एक उत्कृष्ट स्ट्रोक खेळणारा खेळाडू आहे आणि त्याचा बचावात्मक खेळ खूप चांगला आहे. भारताकडे मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल हे दोन बॅकअप सलामीवीर आहेत. त्यामुळे राहुलला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरवले जाऊ शकते.