इंदूर : सलामीवीर लोकेश राहुलच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर पंजाबने रविवारी होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या ३८व्या सामन्यात राजस्थानला सहा विकेटनी हरवले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५२ धावा केल्या. पंजाबने ही धावसंख्या १८.४ षटकांत गाठली आणि विजय मिळला. पंजाबच्या ९ सामन्यांतील हा सहावा विजय आहे आणि आता त्यांचे १२ गुण आहेत. गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे राजस्थानला सहाव्या पराभवास सामोरे जावे लागले. या पराभवामुळे राजस्थानचा प्ले ऑफचा मार्ग अधिकच खडतर झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणला, फलंदाजी करणे सोपे नव्हते. आम्हाला १७०-१७५ धावा हव्या होत्या. या पराभवातून शिकण्याची गरज आहे. हा आमचा नववा सामना होता. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत मात्र फलंदाजांची कामगिरी चांगली होत नाहीयेत. इतकंच नव्हे तर मी स्वत:देखील चांगली बॅटिंग करत नाहीये. 


रहाणे पुढे म्हणाला, आम्ही सगळे प्रोफेशनल क्रिकेटर आहोत. अनेकांना परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे सामन्यात कसेच पुनरागमन करायचेय हेही माहीत आहे. मला वाटते मोठे शॉट खेळण्याबाबत आमच्या मनात दुविधा होता. आम्ही आताही गेममध्ये आहोत. आम्हाला पाचपैकी पाचही सामने जिंकावेच लागतील.