रहाणेने सांगितले अफ्रिकेतील टेस्ट सीरीज पराभवाचे कारण
भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रसारमाध्यमांना नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात त्याने दक्षिण अफ्रिकेत भारताच्या मालिका पराभवाचे कारणही सांगितले.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रसारमाध्यमांना नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात त्याने दक्षिण अफ्रिकेत भारताच्या मालिका पराभवाचे कारणही सांगितले.
मुलाखतीदरम्यान, रहाणेने म्हटले की, दक्षिण अफ्रिकेच्या तुलनेत आमचे गोलंदाज भारी ठरले. ६० बळी घेणे ही साधी गोष्ट नव्हे. पण, आम्हाला हेही विसरून चालणार नाही की, दक्षिण अफ्रिकेची कामगिरीही दमदार राहिली. त्यांनी आमच्या फलंदाजांना मैदानावर स्थिर होऊ दिले नाही. जर आम्हाला पहिल्या दोन सामन्यात चांगली आघाडी मिळती तर, आम्ही नक्कीच मालिका जिंकतो.
रहाणे पुढे म्हणतो, तीनही फॉर्मॅटमध्ये विजय मिळवल्यावर आमचा दौरा पूर्ण झाला. जेव्हा मला समजले की, मला खेळायचे आहे. तेव्हा मी विचार केला की, संघाला फायदा होईल असे काहीतरी करेन.
दरम्यान, या मालिकेदरम्यान पहिल्या दोन सामन्यात रहाणेला खेळण्याची संधी मिळाली नाही. तीसऱ्या सामन्यात संधी मिळाली तेव्हा त्याने ५७ धावा ठोकल्या.