Rahmanullah Gurbaz In IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स संघाने पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स (KKR vs SRH) हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला अन् थाटात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. कोलकाताने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरीचं प्रदर्शन केलं. मात्र, ऐन प्लेऑफच्या तोंडावर सलामीवीर फिल सॉल्टला मायदेशी जावं लागलं. मात्र, केकेआरसाठी धावून आला तो  रहमानउल्ला गुरबाज... (Rahmanullah Gurbaz) रहमानउल्ला गुरबाजने क्वालिफार - 1 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली अन् 23 धावांची आक्रमक खेळी केली. 168 च्या स्ट्राईक रेटने रहमानउल्ला गुरबाजने धावा कुटल्या आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये का? आई आजारी असताना (Rahmanullah Gurbaz Mother) देखील रहमानउल्ला गुरबाजने भारतात आला अन् केकेआरसाठी खेळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केकेआरने यंदाच्या हंगामात उत्तम कामगिरी केली अन् प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली. मात्र, प्लेऑफ सुरू होण्याआधीच इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले. त्याचवेळी फिल सॉल्टने देशासाठी खेळण्यासाठी केकेआरची साथ सोडली. मात्र, गंभीरने प्लॅन आखला अन् नवा खेळाडूच्या दारावर दस्तक दिली. तो होता अफगाणिस्तानचा विकेटकीपर रहमानउल्ला गुरबाज... रहमानउल्ला गुरबाजचा पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. सामना जिंकल्यानंतर रहमानउल्ला गुरबाजने खरी गोष्ट सांगितली.


काय म्हणाला रहमानउल्ला गुरबाज?


सध्या माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी इथे खेळतोय. मी तिच्याशी रोज बोलतो. पण फिल सॉल्ट गेल्यानंतर केकेआर कुटुंबाला माझी गरज भासेल हे मला माहीत होतं, म्हणून मी अफगाणिस्तानातून परत भारतात आलो आणि इथं आल्याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि यासोबत माझी आई देखील माझ्यासाठी आनंदी आहे, असंही रहमानउल्ला गुरबाज याने म्हटलं आहे. 



दरम्यान, रहमानउल्ला गुरबाजने गेल्या आयपीएल हंगामात केकेआरकडून डेब्यू केला होता. गेल्या हंगामात त्याने 11 सामने खेळले अन् 227 धावा केल्या होत्या. तर हा हंगामात त्याने पहिलाच सामना हैदराबादविरुद्ध खेळला. केकेआर आणि हैदराबाद या सामन्यात स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क पुन्हा फॉर्मात आला असून त्याने आपल्या भेदक गोलंदाजीची झलक दाखवलीये. त्यामुळे आता केकेआरचे 24 कोटी फिटले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.