मुंबई : टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid)  हा प्रशिक्षक म्हणून जाणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Bcci President Sourav Ganguly)  दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून द्रविडच कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अखेर गांगुलीने औपचारिक घोषणा केल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. (Rahul Dravid to coach of  Team India in sri lanka tour says bcci president sourav ganguly) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गांगुली काय म्हणाला?


"द्रविडने गेल्या काही वर्षांपासून 19 वर्षांखालील भारतीय संघाचं तसेच इंडिया ए ला मार्गदर्शन करत आहे. द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे", असं गांगुलीने स्पष्ट केलं.


शिखर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी


टीम इंडियाचे 2 संघ एकाच वेळेस इंग्लंड आणि श्रीलंकेत मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा मुख्य संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी जोरदार सराव करतेय. तर भारताचा युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या श्रीलंका दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सलामीवीर शिखर धवनकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. 


एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक


पहिला सामना, 13 जुलै, कोलंबो


दुसरी ओडीआय, 16 जुलै, कोलंबो


तिसरा एकदिवसीय सामना, 18 जुलै, कोलंबो, 


टी 20 मालिका 


पहिली मॅच,  21 जुलै, कोलंबो.


दुसरी टी 20, 23 जुलै, कोलंबो. 


तिसरा टी 20 सामना, 25 जुलै, कोलंबो.


श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया


शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल,  ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन साकरिया. 


राखीव खेळाडू 


ईशान पोरेल, संदीप वारियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजित सिंह. 


संबंधित बातम्या :


WTC Final 2021 | कॅप्टन विराटला 'या' दिग्गजाचे विक्रम मोडीत काढण्याची संधी