नॉटिंगघम :  वर्ल्डकपमधली टीम इंडियाची पुढची मॅच १३ जूनला न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. ही मॅच गुरुवारी ट्रेंट ब्रिज, नॉटिंगंघम येथे खेळवली जाणार आहे. पण या मॅचवर पावसाचे सावट आहे. हवामानाच्या अंदाजानुसार गुरुवारी दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कमी ओव्हरचा खेळ होऊ शकतो. इंग्लंडमध्ये मागील २ दिवसांपासून पाऊस पडत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच पार्श्वभूमीवर स्थानिक हवामान खात्याने अधिसूचना काढली आहे. बुधवार संध्याकाळी ७ पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


यंदाच्या वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये करण्यात आले आहे. सध्या येथे सुरु पाऊस होत असल्याने मॅचमध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन्ही टीमना प्रत्येकी १-१ गुण देण्यात येत आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सोमवारी नॉटिंगघम येथे मॅच खेळली जाणार होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच अनिर्णित राहिली. त्यामुळे दोन्ही टीमना प्रत्येकी १-१ पॉइँट देण्यात आला.  तसेच श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेली मॅचदेखील पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यामुळे दोन्ही टीमना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला.  


बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज (11 जून) मॅच खेळण्यात येत आहे. या मॅचवर देखील पावसाचे सावट आहे. तसेच पावसाच्या व्यत्ययामुळे आज होणारा भारताचा सराव देखील रद्द करावा लागला होता.   
 
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत धमाकेदार सुरुवात केली आहे. टीम इंडिया ४ गुणांसह अंकतालिकेत ताज्या आकडेवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. पावसामुळे पॉइंट्सटेबलवर काही टीमचे पॉइंट्स हे विषम प्रमाणात आहेत.