जेव्हा रात्री भररस्त्यात रैनाची गाडी पंक्चर झाली
टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला फलंदाज सुरेश रैना नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह दिसतो. सोशल मीडियावर तो नेहमी त्याचे फोटो अपलोड करत असतो. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या रेंज रोवर गाडी जवळ उभा असतांना दिसत आहे. रैनाचा हा फोटो कानपूरच्या एका रस्त्यावरचा आहे जेथे त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला फलंदाज सुरेश रैना नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह दिसतो. सोशल मीडियावर तो नेहमी त्याचे फोटो अपलोड करत असतो. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या रेंज रोवर गाडी जवळ उभा असतांना दिसत आहे. रैनाचा हा फोटो कानपूरच्या एका रस्त्यावरचा आहे जेथे त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे.
रैना दिल्लीहून कानपूरला निघाला होता. त्याची रेंज रोव्हर गाडी मध्येच रस्त्य़ात पंक्चर झाली. इटावा येथे भर रस्त्यात त्याची गाडी पंक्चर झाल्याने त्याने याची माहिती कानपूर क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी इटावा पोलिसांना फोन करुन रैनासाठी मदत मागितली.
इटावा पोलिसांनी एका अधिकाऱ्याला रैनाच्या मदतीसाठी पाठवलं. त्यानंतर रैनाला एका प्रायव्हेट गाडीने एका हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं. २ तासानंतर पंक्चर काढण्यात आला. तो पर्यंत रैना त्याच हॉटेलमध्ये थांबला होता.