IPL 2025: राजस्थान सर्वांनाच टफ देणार? द्रविड कोच झाल्यानंतर आता `या` व्यक्तीची बॅटींग कोच म्हणून नियुक्ती
आता द्रविड कोच झाल्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील अजून एका माजी प्रशिक्षकाची राजस्थानने बॅटींग कोच म्हणून नियुक्ती केली आहे.
Vikram Rathour Appointed As Batting Coach Of Rajasthan Royals : आयपीएल 2025 पूर्वी अनेक फ्रेंचायझी आता त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करताना दिसत आहेत. भारताचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड याला राजस्थान रॉयल्सने मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांच्या संघाशी जोडले. आता द्रविड कोच झाल्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील अजून एका माजी प्रशिक्षकाची राजस्थानने बॅटींग कोच म्हणून नियुक्ती केली आहे.
शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत घोषणा केली. त्यांनी यात लिहिले की, "T20 वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक विक्रम राठोर आमच्या सपोर्ट स्टाफमध्ये बॅटिंग कोच म्हणून सामील झाले आहेत आणि राहुल द्रविडसोबत पुन्हा एकत्र आले!" टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकले. त्यावेळी विक्रम राठोर हे टीम इंडियाचे बॅटिंग कोच होते. राजस्थान रॉयल्सला आयपीएलमध्ये 2008 नंतर एकदाही विजेतेपद मिळवता आलं नाही. तेव्हा राहुल द्रविड आणि विक्रम राठोर यांची जोडी राजस्थान रॉयल्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकवून देण्यात किती यशस्वी ठरते हे पाहणं महत्वाचं ठरेल.
हेही वाचा : IND VS BAN Test : बुमबुम बुमराह! बांगलादेशला दिला पहिला झटका, काहीही कळण्याच्या आत उडवल्या दांड्या Video
कोण आहेत विक्रम राठोर?
विक्रम राठोर हे भारताचे माजी क्रिकेटर असून त्यांनी 1996 ते 1997 पर्यंत 6 टेस्ट आणि 7 वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 55 वर्षीय विक्रम राठोर यांनी 2019 ते 2024 या कालावधीत भारतीय संघाचे बॅटिंग कोच म्हणून काम केले. यासोबत त्यांनी आणि त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या राज्य संघांनाही प्रशिक्षण दिले आहे. विक्रम राठोर हे भारतीय संघाचे बॅटिंग कोच असताना टीम इंडिया 2023 वनडे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलपर्यंत पोहोचली होती.
विक्रम राठोरनी व्यक्त केल्या भावना :
राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंग कोचपदी नियुक्ती झाल्यावर विक्रम राठोर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "रॉयल्स फॅमिलीचा भाग होणे माझ्या करता खूप विशेष आहे. राहुलसोबत आणि तरुण क्रिकेटपटूंच्या प्रतिभावान गटासह पुन्हा काम करण्याची संधी मिल्ने खूप विशेष आहे. मी संघाचं व्हिजन आणि राजस्थान रॉयल्स आणि भारतासाठी टॉप क्लास खेळाडू विकसित करण्याच्या ध्येयासाठी कार्य करण्यास उत्सुक आहे"