RR vs CSK Highlights: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 32 रन्सने चेन्नईचा पराभव केला आहे. चेन्नईच्या या पराभवामुळे राजस्थानकडून घेण्यात येणारा बदला अपूर्ण राहिला आहे. तर राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा पॉईंट्स टेबलमध्ये (IPL points table) टॉपवर पोहोचली आहे.  


राजस्थानकडून 203 रन्सचं लक्ष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 203 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर 200 हून अधिक रन्सचा स्कोर करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 86 रन्सची पार्टनरशिर केली. आजच्या सामन्यात यशस्वीने 26 बॉल्समध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सहावं अर्धशतक पूर्ण केलं.


आजच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनला मोठी खेळी करता आली नाही. सॅमसन अवघ्या 17 रन्सवर माघारी परतला. तर यशस्वीने 43 बॉल्समध्ये 77 रन्स केले. ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी पाचव्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशिप केली. चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.


चेन्नईचे फलंदाज ढेपाळले


203 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना CSK टीमची सुरुवात खराब झालेली दिसली. सलामीवीर डेव्हन कॉनवे आज स्वस्तात माघारी परतला. त्यानंतरही ऋतुराजने डाव सांभाळत 27 बॉल्समध्ये 47 धावांची खेळी खेळली. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला जास्त वेळ क्रिजवर थांबता आलं नाही. 15 रन्स करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. 


शिवम दुबेची खेळी व्यर्थ


चेन्नईच्या फलंदाजांची पडझड होत असताना शिवम दुबे आणि मोईन अली यांनी डाव सावरला. दोघांनी मोठे शॉट्स खेळत सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी मोईन अली 23 रन्स करून बाद झाला. दुसरीकडे शिवम दुबेने वेगवान फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 33 बॉल्समध्ये 52 रन्सची खेळी केली. मात्र त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही.