RR Eliminate RCB From IPL 2024 : गेली 17 वर्ष आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत असलेल्या आरसीबीच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 5 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2024 मधला प्रवास थांबवला. त्यामुळे आता आरसीबीचं गेल्या 17 वर्षापासून पाहत असलेलं जेतेपदाचं स्वप्न अपूरंच राहिलंय. राजस्थान रॉयल्सला सुर गवसला असून संजू अँड कंपनीने क्वालिफार-2 मध्ये प्रवेश केलाय. राजस्थानचा सामना आता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध येत्या 24 मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियवर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीने दिलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक 45 धावा केल्या. रियान परागनं 36 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या षटकांमध्ये हेटमायरनं 14 चेंडूत 26 धावा ठोकल्या. रोव्हमन पॉवेल 8 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं 2 विकेट घेतल्या. मात्र, आरसीबीकडून इतर गोलंदाजांना वेळेवर विकेट्स काढत्या आल्या नाहीत. अखेर राजस्थानने 5 गडी राखून सामना खिशात घातला.



एलिमिनेटरमध्ये बेंगळुरूने राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. रजत पाटीदारने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर विराट कोहलीने 33 आणि महिपाल लोमरने 32 धावा केल्या. तर राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार ), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.