Rajasthan Royals Share Video : आपल्या मनात घर करून बसलेल्या आवडत्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे... अनेक प्रेमीयुगलांसाठी हा दिवस म्हणजे सुवर्णक्षण असतो. दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2024) म्हणून साजरा केला जातो. अशातच आता व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आयपीएलमधील टीम राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्सच्या एक्स पोस्टवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये युझी चहल हातात एक फुलांचा गुच्छा घेऊन उभा असलेला दिसतोय. तर समोर जॉस बटलर आपल्या लेकीला कडेवर घेऊन उभा आहे. युझी जेव्हा बटलर जवळ येतो, तेव्हा 'जॉस भाई, तू माझ्या आयुष्याती प्रेम घेऊन आलास. मी जेव्हा तुला मागल्या वर्षी भेटलो, तेव्हा माझं हृदयात धकधक व्हायला लागलं', असं म्हणताच बटलरला आश्चर्याचा धक्काच बसला. तु माझ्यासोबत डेटला येणार का? असा प्रश्न युझीने विचारला. तेव्हा हो नक्कीच... असं उत्तर बटलरने दिलं.



राजस्थान रॉयल्सने एडिट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय. 10 रुपये की पेस्पी युझी भाई सेक्सी, असं देखील बटलर या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय. राजस्थान रॉयल्सने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. काहींनी धनश्री आणि श्रेयस अय्यरवर कमेंट केलीये. श्रेयस भाऊचं काही चुकलं नाही, असं म्हणत काहींनी खोचक प्रतिक्रिया दिलीये.


राजस्थान रॉयल्स : अॅडम झम्पा, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जॉस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठोड, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जयस्वाल, युझवेंद्र चहल.


नवे खेळाडू : रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.