Lady Suryakumar Yadav: स्वत: क्रिकेटचा देव म्हणतोय `व्हा क्या बात है`, टीम इंडियाला मिळाली `लेडी सूर्यकुमार`
Lady Suryakymar Viral Video: सचिन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.
Lady Suryakumar Viral Video: सचिन तेंडूलकर म्हणजे क्रिकेटचा देव. कोणी एखादा बॉलर चुकून राहिला असेल, ज्याने सचिनच्या सामन्यात मार खाल्ला नाही. सचिनने कोणालाच सोडलं नाही. अशा क्रिकेटच्या देवाने जर कोणाचं कौतूक केलं असेल तर ती काळ्या दगडावरची रेख समजावी. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर (Sachin Tendulkar Share Video) केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या क्रिडाविश्वात व्हायरल होताना दिसत आहे. (Rajasthan Villege girl smashes sixes netizens named her lady suryakumar yadav video viral )
राजस्थानमधील एका गावातील गल्ली क्रिकेटमधील हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी (Rajasthan Villege girl) क्रिकेट खेळताना दिसत आहे. तर तिने केलेल्या फटकेबाजीने सचिन तेंडुलकरला देखील अचंबित केलंय. सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.
10 ते 12 वर्षाची मुलगी सूर्यकुमार यादवच्या स्टाईनने धुव्वाधार फलंदाजी करताना दिसत आहे. आगळेवेगळे शॉट पाहून सचिन तेंडूलकरने देखील तोंडभरून कौतूक केलंय. कालच लिलाव संपला अन् आज सामना सुरू? व्वा क्या बात है... तुझ्या फटकेबाजीचा आनंद मी घेत आहे... व्हाट्सअपद्वारे व्हिडिओ मिळालेला, असंही सचिनने यावेळी म्हटलं आहे.
पाहा Video -
दरम्यान, महिला प्रीमियर लीगचा पहिला मेगा लिलाव सोमवारी संपन्न झाला. या लिलावात एकूण पाच संघांनी 60 कोटी रुपये खर्च करून 76 खेळाडूंना खरेदी केलं. एकीकडे महिलांना देखील संधी मिळताना दिसत असताना आता नव्या लेडी सूर्यकुमार तयार होत असल्याने छोरीया कम हे कै? असा डायलॉग मारण्याची संधी साधून आली आहे.