ती आली...ती खेळली आणि तिने जिंकलं
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजी, फलंदाजी या सर्वच आघाड्यांवर भारतीय संघाने चांगली कामगिरी केली.
डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजी, फलंदाजी या सर्वच आघाड्यांवर भारतीय संघाने चांगली कामगिरी केली.
भारताच्या या विजयात मिताली राजसह गोलंदाज राजेश्वरी गायकवाड हिनेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तिने १५ धावांत न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडले.
वर्ल्डकपमध्ये तिने खेळलेला हा पहिलाच सामना. याआधीच्या सहाही सामन्यात राजेश्वरीला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र या सामन्यात तिला संधी देण्यात आली आणि तिने संधीचे सोने केले.
७.३ षटकांत १५ धावा देताना तिने पाच बळी मिळवले. यामुळेच न्यूझीलंडचा डाव ७९ धावांत आटोपला.