T20 World Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी आयर्लंड आणि पाकिस्तान (Pakistan vs Ireland) यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मात्र, पहिल्याच सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानला आरसा दाखवला अन् पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. दुबळ्या आयर्लंडविरुद्ध पाकिस्तानचे पराभव पत्करून आल्या कमजोर बाजू जगासमोर मांडली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या संघावर आता चहूबाजूने टीका केली जात आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनीच पाकिस्तान संघावर घाणाघाती टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले रमीझ राजा?


आयर्लंडविरूद्धच्या पराभवावर कोणीही समर्थन करून शकत नाही. मात्र, पहायला गेलं तर संघाची देहबोली सर्वकाही सांगत होती. तुमचं टीम कॉम्बिनेशन तुमच्या संघावर परिणाम करणार आहे. कॅप्टन बदलमण्ता आलाय, पुन्हा जुन्हा कॅप्टनला जबाबदारी देण्यात आलीये. वर्ल्डकपच्या वर्षात संघचं रँकिंग सातव्या स्थानावर घसरलंय, त्यामुळे ही खूप परिस्थिती म्हणावी लागेल. पाकिस्तानची टीम जर टी-20 वर्ल्डकपमध्ये युएसएकडून हरला तरी आश्चर्य वाटायला नको, असं रमीझ राजा यांनी म्हटलं आहे.


पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? तुमच्याकडे बॅटिंगमध्ये कोणतंच कॉम्बिनेशन नाहीये. तुमची सलामी जोडी देखील सेट नाहीये. जे फॉर्ममध्ये खेळाडू आहेत, ते विकेट्स गमावत आहे. तर मिडल ऑर्डर खराब खेळतीये. त्यामुळे पाकिस्तान सेमीफायनल देखील गाठेल का? असा सवाल मला पडलाय, असं रमीझ राजा यांनी म्हटलं आहे. टी-20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना 9 जून रोजी होणार आहे, त्याआधी पाकिस्तानची अशी परिस्थिती भारतासाठी गुड न्यूज म्हणावी लागेल. 


पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी खेळाडूंना गाजर दाखवलंय.  पाकिस्तानचा संघ जर यंदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तर प्रत्येक खेळाडूला 1,00,000 डॉलर म्हणजेच 2.77 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल, असं गरिबीत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. 


आयर्लंडची प्लेइंग इलेव्हन - पॉल स्टर्लिंग (C), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट.


पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन - मोहम्मद रिझवान, सॅम अयुब, बाबर आझम (C), फखर जमान, शादाब खान, आझम खान (WK), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अब्बास आफ्रिदी.