नवी दिल्ली : हॉकी इंडियाने (एचआय) १५ दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी महिला हॉकी संघाची घोषणा केली आहे. या संघात १८ खेळाडूंचा समावेश आहे. स्ट्रायकर राणी हिच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला हॉकी संघाचा दौरा ५ सप्टेबरपासून हॉलंड येथून सुरू होईल. तो १५ दिवस चालेल. कर्णधार म्हणून स्ट्रायकर राणी सूत्रे सांभाळेल. तर, गोलकिपर सविता उपकर्णधार म्हणून काम पाहिल. संघ निवडताना खेळाडूचा अनुभव आणि कामगिरी याकडे बारीक लक्ष देण्यात आले आहे. या वेळी युवा खेळाडूंना संघात मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यात आले आहे.


संघात निवड करण्यात आलेले खेळाडू


सविता (उपकर्णधार),  रजनी ई, दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, नवदीप कौर, सुनीता लाकडा, रश्मिता मिंज,  नमिता टोप्पो, निक्की प्रधान, मोनिका, करिश्मा यादव, लिलिमा मिंज, नेहा गोयल, राणी (कर्णधार), पूनम राणी, वंदना कटारिया, रिना के, लालरेम्सियामी.