माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू
नाशिक परिसरात शोककळा
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : महाराष्ट्राचे माजी रणजीपटू शेखर गवळी हे कसारा घाटात पाय घसरून दरीत बेपत्ता झाले आहेत. नाशिक जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन तसंच अग्निशमन दल शोध मोहिम राबवत आहे. शेखर गवळी त्यांच्या मित्रांसह इगतपुरी येथील मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी सायंकाळी ५.३० ची घटना. अंधार झाल्यामुळे शोध मोहिम थांबवण्यात आली होती.
आज सकाळपासून पाणबुड्यांच्या मदतीने दोन डोहात शेखर यांचा शोध घेण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. शेखर गवळी नाशिक मध्ये खेळणाऱ्या क्रिकेट पटुची प्रशिक्षक होते. तसेच काही रणजी प्लेयर्स सुद्धा त्यांच्या हाताखाली तयार झाले होते. क्रिकेटमधील एक उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांचं नाव होत त्यांना सायकलिंग आणि ट्रेकिंगची आवड होती.
इगतपुरी येथे शेखर गवळी त्यांच्या सहा मित्रांसोबत ट्रेकिंगला गेले होते. हे सहाही मित्र पुन्हा परतले मात्र शेखर गवळी अद्याप सापडलेले नाहीत. शोध मोहिम सुरू आहे. या घटनेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.