विजयवाडा : भारतातली सगळ्यात प्रतिष्ठीत अशा रणजी ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मागच्या वेळची रणजी चॅम्पियन विदर्भ त्यांचा खिताब वाचवण्यासाठी मैदानात उतरली आहे. विदर्भाचा पहिलाच सामना आंध्र प्रदेशबरोबर सुरु झाला आहे. पण हा सामना सुरु व्हायच्या आधीच वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ आणि आंध्र प्रदेशमधला हा सामना विजयवाडाच्या गोकाराजू लियाला गांगाराजू एसीए क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला. रणजी ट्रॉफी ग्रुप-एच्या या मॅचमध्ये विदर्भाचा कर्णधार फैज फजलने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. विदर्भाचे खेळाडू जसे फिल्डिंगला उतरले तेव्हाच मैदानात साप दिसला.



साप दिसला तेव्हा पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवातच होणार होती, पण सापामुळे बराच वेळ खेळ थांबवावा लागला. ग्राऊंड स्टाफने सापाला मैदानातून पळवल्यानंतर अखेर खेळाला सुरुवात झाली. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ टाकला आहे.