Team India:  टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India Tour Of Bangladesh 2022) आहे. शनिवारी वन डे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला ज्यात भारताने बाजी मारली. मात्र मालिकेतील सलामीचे दोन सामने जिंकून यजमान बांगलादेशच्या संघाने 2-1 ने मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर भारत विरूद्ध बांगलादेश कसोटी मालिका 14 -18 डिसेंबर यादिवशी पहिला कसोटी सामना चटगाव येथे रंगणार आहेत. या मालिकेत पण टीम इंडियात असे तीन खेळाडू आहेत ज्यांचा परिताचा वाटा बंद झाल्याचे दिसून आले आहे. परंतु या तीन खेळाडूला रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) गाजवण्याची संधी मिळू शकते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  भारताची प्रमुख देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) परत आली आहे. 38 संघांसह ही स्पर्धा आज (13 December) सुरू होत आहे. कोरोना संसर्गामुळे मागील हंगाम बदललेल्या फॉर्मेटमध्ये खेळला गेला होता. परंतु यावेळी पुन्हा जुन्या शैलीत परतला आहे. तसेच या फॉरमॅटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत भारतीय कसोटी संघाचा भाग राहिले नाहीत. 


एक वर्षापूर्वी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला मराठमोळा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आता या टीम इंडियाचा भागही नाही. अशा स्थितीत त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीत त्याची शैली दाखवण्याची संधी आहे. या 34 वर्षीय अनुभवी फलंदाजाकडे मुंबईच्या सर्वात यशस्वी रणजी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. गेल्या मोसमात अंतिम फेरीत पराभूत झालेल्या मुंबईला या दिग्गज फलंदाज आणि कर्णधाराकडून यशाची अपेक्षा असतील. 


तसेच कपिल देव यांच्यानंतर भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा एकमेव वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) देखील आता टीम इंडियाचा भाग नाही. इशांत शर्माने नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 311 विकेट्स आहेत. इशांत शर्मा आत्तापर्यंत 80 एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये तो 115 विकेट घेण्यात यशस्वी ठरला, जरी T20 क्रिकेटमध्ये इशांत शर्मा इतका यशस्वी झाला नाही. त्याने 14 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. 


मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) तीन वर्षांपूर्वी भारतीय कसोटी संघात सलामीवीर म्हणून चांगले पदार्पण केले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीला डॉन ब्रॅडमनप्रमाणे वेगवान धावा करणारा मयंक आता पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. त्याला कर्नाटकचे कर्णधारपद देण्यात आले आहे. 


वाचा: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित! 


अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला उपकर्धारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला खराब फॉर्ममुळे पुजारा याला संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतक चेतेश्वर पुजाराच्या जागी हनुमा विहारीची (Hanuma Vihari) निवड केली जात होती. पण विहारीला संघात स्थानही मिळवता आले नाही. भारत अ संघातही त्याचा समावेश नव्हता. अशा स्थितीत आंध्र प्रदेशची कमान सांभाळणाऱ्या या फलंदाजासमोर आपले गमावलेले स्थान परत मिळवण्याचे आव्हान आहे, कारण त्या क्रमांक तीनच्या स्थानासाठी अनेक दावेदार उभे राहिले आहेत. 


रणजी ट्रॉफीसाठी मुंबई टीम (Mumbai team for Ranji Trophy) :  अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, सरफराज खान, सुवेद पारकर, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, शम्स मुलानी, तनूष कोटीयन, तुषार देशपांडे,  मोहित अवस्थी, सिद्दार्थ राऊत, रोयस्टन डायस, सूर्यांश शेंडगे, शंशाक अत्तार्डे आणि मुशीर खान.