इंदौर : रणजी ट्रॉफीची फायनल विदर्भ आणि दिल्लीमध्ये रंगली.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मप्रची व्यावसायिक राजधानी इंदौरमध्ये ही फायनल झाली. दिल्ली या फायनलमध्ये एका दशकानंतर पोहोचली आहे. तर विदर्भ संघाने या प्रदर्शनात सर्वांना आश्चर्यचकित करणारा सामना दाखवला. दिल्लीच्या टिमने गौतम गंभीरच्या कॅप्टनशीपमध्ये रणजी ट्रॉफीचा किताब आपल्या नावे करून घेतला. गंभीर यावेळी देखील टीमचा भाग आहे. मात्र दिल्ली टिमच्या कॅप्टनने फलंदाजीची सर्व जबाबदारी ऋषभ पंत सांभाळत आहे. या अगोदर या टीमचा कॅप्टन इशांत शर्मा होता मात्र दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामुळे तो उपस्थित राहिलेला नाही. 


पहिल्याच दिवशी मैदानात उतरल्यावर दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करून घेतला. हा रेकॉर्ड रन्सचा नाही तर ऋषभ पंतच्या वयाला घेऊन आहे. पंत हा रणजी ट्रॉफी फायनवमध्ये सगळ्यात कमी वयाचा कॅप्टन आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे होता.


ऋषभ पंतने या मॅचमध्ये दिल्लीचे कॅप्टनपद अगदी छानपणे सांभाळली. यावेळी त्याचं वय 20 वर्ष 86 दिवस असं आहे. या अगोदर हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरने केला आहे. 1994-95 मध्ये मुंबई टीमचं कॅप्टन पद सांभाळलं होतं तेव्हा त्याचं वय 21 वर्षे 337 दिवस इतकं होतं. हा रेकॉर्ड आजही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. आताही सचिन सर्वात कमी वयात रणजी ट्रॉफी जिंकणारा कॅप्टन आहे. त्यामुळे आता जर दिल्लीच्या संघाने विजय मिळवला तर ऋषभ पंत हा रेकॉर्ड मोडून नवा रेकॉर्ड आपल्या नावे करेल. 


काही खास ऋषभ पंत करू शकला नाही 


कॅप्टनच्या दृष्टीकोनातून रेकॉर्ड करणारे ऋषभ पंत रणजीच्या या सिझनमध्ये काही खास कमाल दाखवू शकला नाही. तो फायनलमध्ये देखील काही फार वेगळं करू शकला नाही. 21 रनमध्ये तो आऊट झाला. या वर्षात त्याचा सर्वाधिक स्कोर 99 असून त्याने 39.71 च्या अॅव्हरेजने त्याने 278 धावा केल्या आहेत.