मुंबईची `यशस्वी` कामगिरी, यूपीला पराभूत करत Ranji Trophy च्या अंतिम फेरीत धडक, आता मध्य प्रदेशशी लढत
Ranji Trophy Semi Finals: मुंबईच्या संघाने विक्रमी ४७व्यांदा प्रथम श्रेणी स्पर्धेच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
बंगळुरु : मुंबई रणजी करंडकाच्या सेमी फायनलमध्ये उत्तर प्रदेशवर (Ranji Trophy Semi Final) पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईची रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची 47 वी वेळ ठरली आहे. आता मुंबईची विजेतेपदासाठी मध्य प्रदेश विरुद्ध लढत होणार आहे. (ranji trophy semi final mum vs up mumbai beat uttar pradesh now match against madhya pradesh in the final for the title)
सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शनिवारी मैदान ओलं होतं. त्यामुळे पहिल्या सत्रातील खेळ झाला नाही. त्यानंतर दोन्ही संघांचा सामना अनिर्णित ठेवण्याबाबत सहमती झाली. त्यानंतर मुंबईने 4 बाद 553 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला.
मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या. तर यूपीचा संघ पहिल्या डावात केवळ 180 धावाच करू शकला. सामनावीर यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात 100 आणि दुसऱ्या डावात 181 धावा केल्या. दरम्यान 22 जूनपासून बंगळुरूत अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात विजेतेपदासाठी मुंबईचा संघ आता एमपीशी भिडणार आहे.