मुंबई : क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या वादळाला कोण ओळखत नाही. तो मैदानावर येताच गोलंदाजांनाच काय तर फिल्डर्सलाही भीती वाटाला लागते. फील्डर्सही. तो ज्या वेगात चेंन्डू मारतो त्या वेगाला पाहूण गोलंदाज सुद्धा त्याला चेंन्डू टाकायला घाबरतात. जोपर्यंत ख्रिस गेल मैदानात आहे तोपर्यंत विरोधी संघात सुद्धा भीतीचे वातावरण असते. कारण तो कधीही मॅचला पलटू शकतो. त्याच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधित वैयक्तिक धावसंख्या आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु ख्रिस गेल नावाचे वादळ अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या पुढे जरा मंदावले. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये हे दिसून आले आहे. आयपीएल 2021 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मैदानात खेळण्यासाठी आलेला गेल सनरायझर्स हैदराबादचा स्पिनर गोलंदाज राशिद खानसमोर टिकू शकला नाही.


ख्रिस गेलला राशिदने या सामन्यात आपले टार्गेट बनवले आणि या विकेटमुळे राशिद टी -20 मध्ये ख्रिस गेलला सर्वाधिक वेळा आऊट करणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. 9 व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर रशीदने ख्रिस गेलला एलबीडब्ल्यू करुन बाद केले. टी -20 मध्ये पाचव्यांदा राशिदने गेलची विकेट घेतली आहे. टी -20 मध्ये रशीदपेक्षा जास्त हरभजन सिंग आणि ड्वेन ब्राव्होने ख्रिस गेलला जास्त वेळा बाद केले आहे. हरभजनने टी -20 मध्ये गेलला सहा वेळा बाद केले, तर ब्राव्होने गेलला सात वेळा बाद केले आहे.


राशिद आयपीएलच्या माध्यमातून चमकत आहे


राशिदने 2017 मध्ये प्रथम आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तो सनरायझर्स संघाचा महत्त्वाचा सदस्य झाला आहे. पहिल्याच सीझनमध्ये रशीदने आपल्या जादूच्या स्पिनने सगळ्याच मोठ्या फलंदाजांना त्रास दिला आहे. त्याच्या पहिल्या सीझनमध्ये राशिदने 14 सामने खेळले आणि 17 गडी बाद केले. त्यानंतर तो खूप किफायतशीर देखील सिद्ध झाला.


पहिल्या हंगामात त्याची सरासरी 6.62 होती. राशिदच्या कारकीर्दीला येथून नवीन उड्डाण मिळाली आणि त्याने जगातील सर्व लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. त्याने सर्वत्र आपली जादू दाखवली आणि सर्वात मोठे फलंदाज बाद केले. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 66 सामने खेळले आहेत आणि 80 बळी घेतले आहेत.