मैदानावर तरुणीने केले क्रिकेटरला प्रपोज
क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग दरम्यान एका तरुणीने अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर रशीद खानला हटके अंदाजात प्रपोज केले.
नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग दरम्यान एका तरुणीने अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर रशीद खानला हटके अंदाजात प्रपोज केले.
१८ वर्षीय रशीद खान कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये अॅमेझॉन वॉरियर्स संघाकडून खेळतोय. रशीदच्या भेदक गोलंदाजीमुळे सेंट लुसिया स्टार्स संघाला २० षटकांत ७ बाद १०० धावा करता आल्या. या सामन्यात रशीदने ४ षटकांत १९ धावा देताना २ विकेट मिळवल्या.
या सामन्यात रशीद खानच्या चाहत्या असलेल्या तरुणीही आल्या होत्या. यातील एकीने तर पोस्टरद्वारे रशीदला प्रपोज केले. राशिद खान यू आर यंग, आई एम यंग, माय रोटी इज राउंड, लेट्स सेटल डाउन, असं तिने पोस्टरवर म्हटलं होतं. cplt20ने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केलाय.