लाहोर : अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने घोषित केलेल्या टीमवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने अलिकडेच अंडर-१९ संघात वर्ल्डकपसाठी नसीम शाह या १६ वर्षीय खेळाडूची निवड केली. यावरून माजी क्रिकेडपटू रशिद लतिफ यांनं ट्विटवरवरून पाकिस्तानी बोर्डाच्या धोरणांवर टीका केलीय. पीसीबी वयाबाबत खोट्या डॉक्टरांशी हातमिळवणी करून घोळ घालू नका, स्वत:चं हसं करून घेऊ नका, अशा शब्दांत त्यानं सुनावलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाकिस्तानी क्रिकेट टीमचे खेळाडू अंडर-१९ खेळत आहेत. अंडर-१९ खेळाडू अंडर-१६ खेळतायत. अंडर-१६ खेळाडू अंडर-१३मध्ये दिसत आहेत आणि अंडर-१३चे खेळाडू त्यांच्या आईच्या कुशीत आहेत. खेळाडूंच्या वयाबाबत खोट्या डॉक्टरांशी हातमिळवणी करुन स्वत:चं हसं करुन घेऊ नका,' असं ट्विट राशिद लतिफने केलं आहे.


ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमधून नसीम शाह या फास्ट बॉलरचं पदार्पण झालं. नसीम शाह याचं वय १६ वर्ष सांगण्यात येत असलं तरी त्याच्या याच वयावरून आता वाद सुरु झाला.


नसीम शाह याने १६ वर्ष २७९ दिवसाचा असताना ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच खेळली. नसीम शाह याचं वय १६ वर्ष जरी सांगण्यात येत असलं तरी पाकिस्तानी वेबसाईट 'द डॉन'चा जुना लेख व्हायरल झाला. वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू एण्डी रॉबर्ट्स यांचा हा लेख आहे. १६ वर्षाचा हा युवा फास्ट बॉलर मला फार आवडला आहे, असं एण्डी रॉबर्ट्स म्हणाले होते. ७ ऑक्टोबर २०१६ सालचा हा लेख आहे. आता २०१९ साली म्हणजेच ३ वर्षानंतरही नसीम शाह १६ वर्षांचाच कसा हा प्रश्न उपस्थित झाला.


पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार साज सादीक यांचंही २०१८ सालचं एक ट्विट समोर आलं आहे. 'पाकिस्तान सुपर लीगच्या क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱ्या १७ वर्षांच्या नसीम शाह याच्या पाठीला दुखापत झाली आहे. तो सरावासाठी परतला आहे. पीएसएलच्या चौथ्या मोसमासाठी तो फिट होण्याची अपेक्षा आहे', असं ट्विट साज सादीक यांनी केलं होतं.


साज सादीक यांचं हेच ट्विट मोहम्मद कैफने रिट्विट करुन निशाणा साधला. भविष्य चांगलं वाटत आहे, पण तो १६ सध्या वर्षांचा आहे. वयाने तो लहान होतोय, असा टोमणा कैफने लगावला.



पाकिस्तानी खेळाडूंवर वय चोरण्याचा आरोप याआधीही झाला आहे. शाहिद आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रातरही आपण वय चोरल्याचं मान्य केलं आहे. शाहिद आफ्रिदीने वयाच्या १६व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण पदार्पण केलं तेव्हा आपलं वय १९ वर्ष होतं, असं आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलं.