मुंबई : राजस्थान टीममधील दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी वान डर डुसेन याची पत्नी लाराने एक खळबळजनक विधान केलं. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. लाराने इंग्लंडचा क्रिकेटपटू जोस बटलरवर खळबळजनक विधान केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाराने जोस बटलरला थेट आपला दुसरा पती असल्याचं म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. डुसेन आणि बटलर दोघंही राजस्थान टीममधून खेळत आहेत. आज बंगळुरू विरुद्ध राजस्थानचा सामना होत आहे. 


दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी वान डर डुसेनची पत्नी लारा राजस्थान रॉयल्स पॉडकास्टमध्ये म्हणाली, 'मला वाटतं की मी आता जोस बटलरला माझा दुसरा पती म्हणून दत्तक घेतलं आहे. मला जोस बटलरची पत्नी लुईस म्हणून ओळखले जातं. पण मी लुईस नाही. 


रसी वान डर डुसेनची पत्नी लारा म्हणाली, 'जोस बटलरच्या पत्नीचे नाव लुईस आहे, मी त्यांना यापूर्वी भेटले नाही. लोकांना वाटते की मी जॉस बटलरची पत्नी आहे. मी खरंतर जोस बटलरची पत्नी नाही, पण मी त्याला चीअर्स नक्की करेन माझा त्याला पाठिंबा आहे. 


जेव्हा जेव्हा जोस बटलर चौकार षटकार ठोकत होता तेव्हा कॅमेरा लारावर जात होता त्यामुळे हा नेटकऱ्यांचा किंवा क्रिकेटप्रेमींचा गैरसमज झाला असावा असंही लारा म्हणाली.