Ratnagiri Jets Win MPL 2023 Trophy: सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीगची (Maharashtra Premier League) सांगता झाली आहे. एमपीएलचा (MPL 2023) अंतिम सामना शुक्रवारी पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा रत्नागिरी जेट्सने (Ratnagiri Jets) जिंकली आहे. रत्नागिरी जेट्सने अखेर एमपीएलची ट्रॉफी उचावली. रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) यांच्यातील हा सामना गुरूवारी खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे सामना रिझर्व्ह डे (Reserve Day) दिवशी खेळवावा लागला. मात्र, रिझर्व्ह डे दिवशी देखील पावसाने हजेरी लावल्याने अखेर रत्नागिरी जेट्सला विजयी घोषित करण्यात आलंय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसामुळे नाणेफेक देखील न झाल्याने सामना राखीव दिवशी शुक्रवारी खेळला गेला. शुक्रवारी देखील प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूरचा डाव सुरू असताना पावसाने हजेरी लावली. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूरने 16 षटकात 8 बाद 80 धावा केल्या. त्यानंतर तब्बल 3 तास पाऊस सुरू होता. त्यामुळे रत्नागिरी संघाला विजयी घोषित केलं गेलं. प्रदीप धाडे व कुणाल थोरात या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत कोल्हापूरच्या पैलवानांना पाणी पाजलं. अंकित बावणे, साहिल औताडे, नौशाद शेख आणि सिद्धार्थ म्हात्रे हे फलंदाज झटपट बाद झाले. कॅप्टन केदार जाधवने 30 धावा करत सामना खेचण्याचा प्रयत्न केला.


केदार जाधवने (Kedar Jadhav) 28 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. त्यानंतर कोल्हापूरचा डाव गडगडला आणि 16 ओव्हरमध्ये फक्त 80 धावा करता आल्या. सामना रोमांचक होणार अशी परिस्थिती असताना पावसाने हजेरी लावली अन् सामन्यावर पाणी फेरलं. त्यानंतर सामना होऊ शकला नाही. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला विजयी घोषित करण्यात आलं.


आणखी वाचा - MS Dhoni ची साथ सोडल्यानंतर Ambati Rayudu ने सुरू केली नवी इनिंग, आता 'या' मैदानात उतरणार!


दरम्यान, सामना जिंकता आला नसला तरी कोल्हापूरच्या अंकित बावणे (Ankit Bawane) याने ऑरेंज कॅप नावावर केलीये. तर पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसले याने पर्पल कॅप जिंकली आहे. विजेत्या संघाला म्हणजेच रत्नागिरी टीमला 50 लाख रुपये बक्षीस मिळालं आहे. विजेत्या कोल्हापूर संघाला 25 लाख रुपये बक्षिस देण्यात आलंय.