मुंबई : रवी शास्त्री याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते २०१९च्या वर्ल्ड कपपर्यंत शास्त्री टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल. याआधी शास्त्रीनं २०१४पासून ते २०१६पर्यंत टीम इंडियाचा डायरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी बीसीसीआयच्या सल्लागार समितीला दिले होते. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांचा समावेश होते.


टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सल्लागार समितीनं पाच जणांच्या मुलाखती घेतल्या यात रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला.