मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या जून्या फॉर्मेटसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वनडे फॉर्मेट बंद करण्याची मागणी जोर धरत असतानाचं आता टेस्ट क्रिकेटच्या फॉर्मेटवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या या जून्या फॉर्मेटसवर बंदी अथवा बदलाची मागणी का होतेय? तसेच अशी मागणी करतोय तरी कोण असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टेस्ट क्रिकेट संदर्भात मोठं विधान केलं आहे.  शास्त्री म्हणालेत, टेस्ट क्रिकेटचा फॉरमॅट केवळ टॉप 6 टीम पुरताच मर्यादित ठेवला जावा असे त्यांचे म्हणणे आहे. तर ते पुढे म्हणतात, टेस्ट क्रिकेट तुमची परीक्षा घेते, त्यामुळे तुम्हाला तुमची गुणवत्ता दाखवणे गरजेचे आहे. जर तुमच्यात गुणवत्ताच नसेल तर टेस्ट क्रिकेट कोण पाहणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
रवी शास्त्री म्हणाले, टेस्ट क्रिकेटचा फॉरमॅट केवळ टॉप 6 टीम पुरताच मर्यादित ठेवला गेला पाहीजे. ज्या टीमना या 6 टीमचे पात्र व्हायचे आहे, त्यांनी त्यांची क्षमता दाखवून सहभागी व्हावे. जर टीममध्ये गुणवत्ताच नसेल तर टेस्ट क्रिकेट कोण पाहणार ? असा सवाल करत शास्त्री म्हणाले, जर विरोधी टीम तुमच्यापेक्षा दुबळी असेल तर पाच दिवसांचा खेळ दोन दिवसांत संपतो. 


शास्त्री यांच्या मते वेस्ट इंडिज, बांगलादेश, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि श्रीलंका हे संघ कसोटीला मुकतील. कारण या संघाचा अद्याप कसोटी क्रमवारीत समावेश नाही. त्यामुळे या 6 टीममध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आपला खेळ दाखवावा लागेल.  


वनडे क्रिकेट बंद करावा? 
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमने एकदिवसीय क्रिकेटचा फॉर्मेट जुना झाल्याचं मत व्यक्त केलं आहे. 'मला वाटते आता एकदिवसीय क्रिकेट फॉर्मेट बंद केला पाहीजे. इंग्लंडमध्ये स्टेडियम खचाखच भरलेले असतात. पण भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय सामन्यादरम्यान स्टेडियम रिकामी असतात. फक्त नावासाठी वनडे क्रिकेट खेळवलं जातं आहे. हा फॉर्मेट आता जुना झाला आहे.


दरम्यान या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंनी केलेल्या या वक्तव्यानंतर खरंच क्रिकेटमध्ये तसे बदल होणार आहेत का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.