मुंबई : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं नवीन खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदी ट्विटरवर यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. यावेळी एका यूजरनं तुला बूम-बूम हे नाव कोणी ठेवलं असा प्रश्न आफ्रिदीला विचारला. भारतीय क्रिकेटपटूनं मला हे नाव दिल्याचं आफ्रिदीनं सांगितलं. रवी शास्त्री मला पहिल्यांदा बूम-बूम म्हणाला होता. त्यानंतर माझं हे नाव प्रसिद्ध झालं, असं उत्तर आफ्रिदीनं दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शास्त्री हे सध्या भारतीय टीमचे प्रशिक्षक आहेत. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमला शास्त्री प्रशिक्षण देत आहेत. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-२नं पिछाडीवर आहे. चौथी टेस्ट मॅच ३० ऑगस्टपासून सुरु होणार आहे.


शाहिद आफ्रिदीनं २०१५ साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली. आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११,१९६ रन केले आहेत. आफ्रिदीची सरासरी वनडेमध्ये २३.५७ आणि टी-२० मध्ये १७.९२ एवढी आहे.