मुंबई: टीम इंडियाला नवा प्रशिक्षक कोण असणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. क्रीडा विश्वातून मोठी बातमी येत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडिय़ाला नवा कोच मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर पाचव्या कसोटी सामना स्थगित झाल्यानंतर रवि शास्त्री राजीनामा देणार अशी चर्चा सुरू झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया 17 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रॉफी टीम इंडिय़ाने गमवल्यानंतर आता टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खूप अपेक्षा आहेत. त्याआधी एक सर्वात मोठी बातमी येत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवि शास्त्री टी 20 वर्ल्ड कपनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


रवि शास्त्री यांचा करार वाढवण्याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र हा करार त्यांनी पुन्हा केला नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा नव्या प्रशिक्षकपदी कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 


टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी तीन दिग्गजांची चर्चा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्य़ापूर्वी टीम इंडिय़ाला नवा कोच मिळण्याची शक्यता आहे. अजून य़ासंदर्भात अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत. दुसरीकडे राहुल द्रविड नाही तर माइक हेसन, वीरेंद्र सेहवाग, टॉमी मूडी या तीन दिग्गजांची नावं आता चर्चेत आहेत. 
 
माइक हेसन हे न्यूझीलंडचे माजी कोच आहेत. जे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठीचे पुढचे दावेदार आहेत. त्यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्जही केला होता. हेसन यांच्या प्रशिक्षणाने न्यूझीलंड संघ 2015 मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. याशिवाय RCB चे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स आहेत. त्यामुळे विराट कोहली त्यांना प्रशिक्षपदासाठी पहिली पसंती देऊ शकतो अशी चर्चा आहे.


आपल्या तुफान फलंदाजीनं जगात प्रसिद्ध असलेल्या विरेंद्र सेहवाग यांचंही नाव या यादीमध्ये आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागनं अर्ज दिला आहे. याशिवाय BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत चांगले संबंध देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. 


टॉम मूडी तिसरे दावेदार आहेत. सिलेक्शन प्रोसेसमध्ये या दोघांनाही टफ फाईट टॉम मूडी देऊ शकतात. माइक हेसन यांच्यासोबत टॉम यांनी देखील टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता नेमकं कोण प्रशिक्षकपदी येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.