रवी शास्त्री पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, फोटो ट्विट केला आणि...
सोशल नेटवर्किंगवर फोटो शेयर केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात.
मुंबई : सोशल नेटवर्किंगवर फोटो शेयर केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. यावेळीही रवी शास्त्रींना असाच अनुभव आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला. यानंतर टीम इंडियाचे सदस्य सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.
रवी शास्त्री एंटिगाच्या 'कोको बे'ला गेले होते. तिकडून रवी शास्त्रींनी फोटो ट्विट केला. 'खूप गरमी आहे. ज्यूस प्यायची वेळ आहे'. असं कॅप्शन रवी शास्त्रींनी त्यांच्या फोटोला दिलं. यानंतर रवी शास्त्रींना ट्रोल करण्यात आलं.
या विजयानंतर टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल याने वेस्ट इंडिजच्या समुद्रातला बोटीवरचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली, मयंक अग्रवाल, आर. अश्विन यांच्यासोबतच विराटची पत्नी अनुष्का शर्माही दिसत आहे. 'एंडलेस ब्लूज' असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे.