Ravi Shastri Slams Michael Vaughan: भारताचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायल वॉर्ननला चांगलेच फैलावर घेतले आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 चं वेळापत्रक हे भारतीय संघाला साजेसं होतं अशी टीका करणाऱ्या वॉर्नलला शास्त्री गुरुजींनी चांगलेच झापले आहे. गुआनामध्ये उपांत्य फेरी होणार या उद्देशाने भारतीय संघाला झुकतं माप देण्यात आलं, असा दावा वॉर्नने केला आहे. भारतीय संघाला हा असा अॅडव्हानटेज मिळाल्याने इतर संघांबरोबर दुजाभाव करण्यात आला असं वॉर्नचं म्हणणं आहे. 


नेमकं काय म्हणाला इंग्लंडचा माजी कर्णधार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर एटच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचं स्थान कोणतंही राहिलं असतं तर भारतीय संघ सायंकाळी 8 वाजता गुआनामध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळणार हे निश्चित झालं होतं. भारतीय संघाने इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करुन फायनलमध्ये धडक मारली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा फायनल सामना 7 धावांनी जिंकत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. याच वेळापत्रकासंदर्भात वॉर्नने, "हा सेमीफायनलचा समाना गुआनामध्येच होणार होता. मात्र संपूर्ण कार्यक्रमच भारतीय संघाच्या बाजूने कल असलेल्याप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे. इतर संघांबरोबर हा प्रकार म्हणजे अन्याय करण्यासारखा आहे," असं ट्वीट केलं होतं.


नक्की वाचा >> 'राजकीय अजेंड्यामुळे जय शाहांना...'; गृहमंत्र्यांचा उल्लेख करत गावसकरांचं रोखठोक विधान


शास्त्रींनी वॉर्नला चांगलच फैलावर घेतलं


मात्र वॉर्नच्या या विधानावरुन शास्रींनी त्याला झापलं आहे. शास्त्रींनी वॉर्नला 'आधी त्याने इंग्लंडच्या टीमची चिंता करावी' असा टोला लगावला आहे. शास्त्रींनी 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "मायलक त्याला वाटेल ते बोलू शकतो. त्याच्या बोलण्याच्या भारतात कोणालाही काहीही फरक पडत नाही. त्याने आधी इंग्लंडच्या संघांबद्दलचा गोंधळ निस्तरला पाहिजे. उपांत्यफेरीमध्ये इंग्लंडच्या संघाबरोबर काय झालं यावर आधी त्याने त्याच्या संघाला सल्ला दिला पाहिजे. भारताला चषक उचलण्याची सवय आहे. मला ठाऊक आहे की इंग्लंडने दोनदा विजय मिळवला आहे. मात्र भारत चारवेळा जिंकला आहे. मला आठवत नाही की मायकलने कधी असा चषक उचलला आहे. त्यामुळे बोलण्याआधी त्याने दोनदा विचार करायला हवा. तो माझा सहकारी आहे मात्र माझं त्याला हेच उत्तर आहे," असं रवी शास्त्री म्हणाले. रवी शास्त्रींनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराची लाजच काढल्याचं दिसून येत आहे.



नक्की पाहा >> ₹125 कोटींच्या बक्षिसापेक्षाही रोहित-विराटला मोठं सप्राइज देणार BCCI? धोनीप्रमाणे...


सूर्याच्या कॅचवर शंका घेणाऱ्यांनाही टोला


रवी शास्त्रींनी सूर्यकुमार यादवने टी-20 वर्ल्ड कप फायलनमध्ये घेतलेल्या डेव्हिड मिलरच्या भन्नाट कॅचच्या वैधतेवर शंका उपस्थित करणाऱ्यांनाही झापलं आहे. "द्राक्षं अंबट असतात असा हा प्रकार आहे. पाच वर्षानंतर तुम्ही रेकॉर्ड बुक्स चेक करा तिथे भारत विजेता असल्याचं लिहिलेलं सापडेल," असा टोला शास्त्रींनी लगावला आहे.