₹125 कोटींच्या बक्षिसापेक्षाही रोहित-विराटला मोठं सप्राइज देणार BCCI? धोनीप्रमाणे...

BCCI May Take Big Decision: भारतीय संघाने 2024 ची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडे एक मोठी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात काय निर्णय होतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मागणी नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात.

| Jul 06, 2024, 21:26 PM IST
1/10

virat kohli rohit sharma jerseys

भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माबरोबरच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  

2/10

virat kohli rohit sharma jerseys

विराट आणि रोहितने ही निवृत्ती जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे म्हणजेच बीसीसीआयकडे एक खास मागणी केली आहे. ही मागणी विराट आणि रोहित संदर्भात आहे. 

3/10

virat kohli rohit sharma jerseys

विराट परिधान करतो ती जर्सी क्रमांक 18 आणि रोहित परिधान करतो ती जर्सी क्रमांक 45 कायमची निवृत्त करावी असं सुरेश रैनाचं म्हणणं आहे.

4/10

virat kohli rohit sharma jerseys

महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीनंतर जर्सी क्रमांक 7 निवृत्त केली तसाच निर्णय आता रोहित आणि विराटसंदर्भात पुन्हा घेतला जावा असं रैनाने म्हटलं आहे.  

5/10

virat kohli rohit sharma jerseys

"मी बीसीसीआयला विनंती करतो की त्यांनी जर्सी क्रमांक 18 आणि 45 निवृत्त करावा. या जर्सी विशेष पद्धतीने बीसीसीआयच्या कार्यालयामध्ये ठेवाव्यात. 7 क्रमांकाची जर्सी आधीच निवृत्त करण्यात आली आहे. त्यांनी असाच निर्णय जर्सी क्रमांक 18 आणि 45 संदर्भात घ्यावा," असं रैना म्हणाला.

6/10

virat kohli rohit sharma jerseys

"या जर्सी पाहणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळाली पाहिजे. अनेक कठीण परिस्थितींमधून भारताला जर्सी क्रमांक 18 आणि 45 ने विजय मिळवून दिला आहे. केवळ या जर्सी पाहून भारतीय संघात येणाऱ्या प्रत्येक नव्या खेळाडूला प्रेकरणा मिळाली पाहिजे," असं रैना म्हणाला.

7/10

virat kohli rohit sharma jerseys

जर्सी क्रमांक 18 आणि 45 परिधान करताना खेळाडूंवर प्रेशर असेल असं मत माजी क्रिकेटपटू अभिनव मुकुंदने व्यक्त केलं.  

8/10

virat kohli rohit sharma jerseys

नॅशनल बास्केटबॉल असोसीएशन म्हणजेच एनबीएप्रमाणे बीसीसीआयनेही विराट आणि रोहितसारख्या मोठ्या खेळाडूंच्या जर्सी निवृत्त कराव्यात.

9/10

virat kohli rohit sharma jerseys

"मी एनबीए फॉलो करतो आणि तिथे मोठ्या खेळाडूंच्या जर्सी निवृत्त करण्याची पद्धत आहे. असाच प्रकार भारतीय क्रिकेटमध्ये व्हायला हवा. पुढे या क्रमांकाच्या जर्सी घालणाऱ्या खेळाडूंवर कामगिरीचा किती ताण असेल याचा विचार करा," असं मुकुंद म्हणाला. 

10/10

virat kohli rohit sharma jerseys

आता बीसीसीआय खरोखरच धोनीप्रमाणे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जर्सीसंदर्भात मोठा निर्णय घेणार का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळू शकेल. असं झालं तर रोहित आणि विराटला दिलेला हा सन्मान 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाहूनही मोठा असेल. कारण आतापर्यंत टी-20 मध्ये बीसीसीआयने केवळ धोनीला हा सन्मान दिला आहे. तर सर्वात आधी या सन्मानाचा मानकरी ठरलेला भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर हा आहे. विराट आणि रोहितला या दोघांच्या पंक्तीत बसण्याची सुवर्णसंधी या माध्यमातून मिळू शकते.