दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. याचबरोबर भारताने ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. याचा परिणाम टीम इंडियाच्या खेळाडूंच्या क्रमवारीवरही झाला आहे. विशाखापट्टणम टेस्टमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे अश्विन १०व्या क्रमांकावर पोहोचला होता. पुण्यात झालेल्या दुसऱ्या टेस्टनंतर अश्विन ७व्या क्रमांकावर आला आहे. अश्विनशिवाय टॉप-१० बॉलरमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह आहे. पण दुखापतीमुळे बुमराह या टेस्ट सीरिजमधून बाहेर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही क्रमवारीत फायदा झाला आङे. रहाणेने दुसऱ्या टेस्टमध्ये ५९ रनची खेळी केली होती. विराटसोबत रहाणेने १७८ रनची पार्टनरशीप केली होती. आता रहाणे ९व्या क्रमांकावर आहे.


पुणे टेस्टमध्ये टेस्ट क्रिकेटमधलं ७वं द्विशतक करणारा विराट कोहली स्टीव्ह स्मिथपेक्षा एक रेटिंग पॉईंट मागे आहे. आधी या दोघांमध्ये २५ पॉईंटचा फरक होता. स्मिथ पहिल्या क्रमांकावर आणि कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कोहली आणि रहाणेशिवाय चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे.