Ravichandran Ashwin: सध्या इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवला जातोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनने ( Ravichandran Ashwin ) 500 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. मात्र यानंतर अश्विनसंदर्भात ( Ravichandran Ashwin ) एक मोठी बातमी समोर आली. टेस्ट सामना सुरु असतानाच अश्विन अचानक स्कॉडमधून बाहेर झाल्याची माहिती मिळाली. बीसीसीआयने ( BCCI ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून याची पुष्टी केलीये.


BCCI ने दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विन ( Ravichandran Ashwin ) अचानक तिसऱ्या टेस्टमधून बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला. यावेळी बीसीसीआयने एक निवेदन जाहीर केलं आहे. या निवेदनात म्हटलंय की, 'कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे रविचंद्रन अश्विनने ( Ravichandran Ashwin ) तत्काळ टेस्ट टीममधून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि संघ अश्विनला पूर्ण पाठिंबा देतं. बीसीसीआय चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला आपला पाठिंबा देतो. खेळाडू आणि त्यांच्या प्रिय व्यक्तींचं आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 


राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं कारण


बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अश्विनसंदर्भात ( Ravichandran Ashwin ) सोशल मीडियावर पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये अश्विनच्या आईची प्रकृती खालावल्याची माहिती देण्यात आलीये. याच कारणामुळे अश्विन ( Ravichandran Ashwin ) टेस्ट सामन्यातून बाहेर पडला असल्याचं समजतंय. पोस्ट शेअर करताना राजीव शुक्ला यांनी म्हटलंय की, 'मी त्याच्या आईला लवकर बरे होण्याची मी आशा व्यक्त करतो. त्याला राजकोट टेस्ट सोडून आईसोबत राहण्यासाठी चेन्नईला जावं लागलंय.


अश्विनचा 500 विकेट्सचा रेकॉर्ड


दरम्यान या सामन्या रविचंद्रन अश्विनने ( Ravichandran Ashwin ) त्याच्या नावे एका नव्या रेकॉर्डची नोंद केलीये. राजकोट टेस्टमध्ये अश्विनने 500 विकेट्स घेत यशाचं नवं शिखर गाठलं आहे. राजकोटच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अश्विनने ( Ravichandran Ashwin ) जॅक क्रॉलीला आपला 500वा बळी बनवलं. यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. अश्विनच्या ( Ravichandran Ashwin ) पुढे टीम इंडियाचे फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आहेत. कुंबळे यांनी 619 विकेट्स घेतले आहेत.