मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची सीरिज कानपूर इथे होत आहे. पहिल्याच सामन्यान आर अश्विननं दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा सीनियर स्पिनर आर अश्विनने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर हरभजन सिंगचा रेकॉर्ड मोडला आहे. आता कपिल देव यांचा मोडण्याच्या तयारीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविचंद्रन अश्विनने सोमवारी न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला क्लीन बोल्ड करताच त्याच्या 418 विकेट पूर्ण केल्या. हरभजन सिंगने कसोटी सामन्यात 417 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा विक्रम मोडीत काढत आर अश्विननं 418 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. 


आर अश्विननं कानपूर कसोटीमध्ये पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरमचाही विक्रम मोडला आहे. वसीम अकरमने कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये 414 विकेट्स घेतल्या होत्या. आता वसीम अकरम आणि हरभजन सिंगला मागे टाकत अश्विन क्रमवारीत पुढे केला आहे. 



टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा रेकॉर्ड आर अश्विन मोडण्याच्या तयारीत आहे. त्यांनी 434 कसोटी सामन्यात विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. याआधी अश्विनला  शॉन पोलॉक (421 विकेट), रिचर्ड हेडली (431),  रंगना हेराथ (433) यांचे रेकॉर्ड मोडावे लागणार आहेत.


1. मुथैया मुरलीधरन- 800 (श्रीलंका)
2. शेन वॉर्न- 708 (ऑस्ट्रेलिया)
3. जेम्स एंडरसन- 632 (इंग्लंड) 
4. अनिल कुंबळे- 619 (भारत)
5. ग्लेन मेक्ग्रा- 563 (ऑस्ट्रेलिया) 
6. स्टुअर्ट ब्रॉड- 524 (इंग्लंड)
7. कर्टनी वॉल्श- 519 (वेस्टइंडीज)
8. डेल स्टेन- 439 (दक्षिण आफ्रिका)
9. कपिल देव- 434 (भारत)
10. रंगना हेराथ- 433 (श्रीलंका)
11. रिचर्ड हेडली- 431 (न्यूझीलंड)
12. शॉन पोलॉक- 421 (दक्षिण आफ्रिका)
13. रविचंद्रन अश्विन- 419 (भारत)
14. हरभजन सिंग- 417 (भारत)
15. वसीम अकरम- 414 (पाकिस्तान)