IND vs ENG : कुलदीप यादव मोठ्या मनाचा, इंग्लंडची इनिंग संपल्यावर अश्विनसोबत काय केलं पाहा...Video
England vs India : इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला (Ravichandran Ashwin) असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं (Kuldeep Yadav) कौतूक केलंय.
Kuldeep Yadav On Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड याच्यातील पाचवा कसोटीला सामना धर्मशाला स्टेडिअमध्ये (Dharmashala) खेळवला जातोय. या सामन्यात देवदत्त पेडिक्कल याचा डेब्यू झाला. टॉस जिंकून इंग्लंडने पहिली फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. पण बेन स्टोक्सचा हा निर्णय टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. टीम इंडियाची फिरकी जोडी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि आर आश्विनने (R Ashwin) यांनी इंग्लंडला पहिल्याच दिवशी गुंडाळलं. इंग्लंडचा पहिला डाव फक्त 218 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं कौतूक केलंय.
नेमकं काय झालं?
इंग्लंडला 218 धावांवर रोखण्यात कुलदीप आणि आश्विनचा फार मोठा वाटा होता. कुलदीप यादवने 5 विकेट्स तर आर आश्विनने 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव कोसळल्यानंतर टीम इंडिया डगआऊटकडे जात होती. मोठ्या पराक्रमानंतर अभिवादन (gesture) करण्याची परंपरा असते. अशातच कुलदीपने हा मान आश्विनला दिला. मात्र, आश्विनने पाच विकेट्स घेणाऱ्या कुलदीपला हा मान परत केला. त्यावेळी या दोघांमध्ये प्रांजल भांडणं झाली. अरे तू घे.. तू घे म्हणत दोघांमध्ये चढाओढ सुरू झाली. त्यावेळी आश्विनने कुलदीपची समजूत घातली अन् कुलदीपला पुढे पाठवलं.
कुलदीप यादव काय म्हणाला?
ॲश भाई खूप दयाळू आणि नम्र आहे, तो खूप प्रेमळ आणि विनम्र माणूस आहे, मी त्याला पुढे केलं, पण त्याने मला सांगितलं की त्याच्याकडे 35 पाच विकेट्स आहेत म्हणून हा मान तुम्ही ते ठेवू शकता, असा खुलासा कुलदीप यादवने केला आहे.
पाहा Video
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.