निलंबनाच्या कारवाईवर जाडेजाने फिल्मी डायलॉगबाजी करून व्यक्त केली खंत
टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या एका टेस्ट टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दोन वर्षांच्या काळामध्ये दुसऱ्यांदा गैरवर्तन केल्यामुळे जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाराज झालेल्या जडेजाने एका फिल्मी डायलॉगमधून आपली खंत व्यक्त केलीये.
कोलंबो : टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या एका टेस्ट टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दोन वर्षांच्या काळामध्ये दुसऱ्यांदा गैरवर्तन केल्यामुळे जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाराज झालेल्या जडेजाने एका फिल्मी डायलॉगमधून आपली खंत व्यक्त केलीये.
जाडेजाने ट्विट करून ‘हम शरीफ क्या हुए सारी दुनिया ही बदमाश हो गई’ या डायलॉगने त्याच्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. या डायलॉगसोबत जाडेजाने कोणतीही कॅप्शन लिहिलेली नाही. मात्र त्याने अप्रत्यक्षपणे निलंबनावर नाराजी व्यक्त केली. जाडेजावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. १२ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जाडेजा खेळू शकणार नाहीए.
कोलंबो टेस्ट खेळण्यापूर्वी जडेजाकडे तीन डिमेरीट पॉईंट्स होते. ऑक्टोबर २०१६ साली इंदोरच्या मॅचमध्ये पिचवर धावल्यामुळे जडेजाला हे पॉईंट देण्यात आले होते. तर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये जडेजानं स्वत:च्याच बॉलिंगवर त्याच्या हातात आलेला बॉल बॅट्समन दिमुथ करुणारत्नेच्या दिशेनं भिरकावला.
जडेजानं मुद्दामहून हा प्रकार केल्याचं अंपायर रॉड टकर आणि ब्रुस ऑक्सेम्फर्ड यांना वाटल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. जडेजानंही त्याची ही चूक मान्य केली आहे.