world cup 2019: पराभवानंतर जडेजाची पहिली भावनिक प्रतिक्रिया
सेमीफायनलच्या अटीतटीच्या मॅचमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 18 रनने पराभव केला.
मँचेस्टर : सेमीफायनलच्या अटीतटीच्या मॅचमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 18 रनने पराभव केला. 240 रन्सच्या आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. पण रविंद्र जडेजाने झुंजार 77 रनची खेळी करत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जागवल्या. पण नंतर जडेजाही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. जडेजाच्या मागोमाग धोनीने देखील आपली विकेट गमावली.
धोनी रनआऊट झाल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. या पराभवानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली. या पराभवावर रविंद्र जडेजाने देखील आपल्या भावना ट्विटवरुन व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाला जडेजा ?
कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये. पराभूत झाल्यानंतरही ठामपणे उभं राहणे हे मी खेळामधून शिकलो आहे. मला क्रिकेटचाहत्यांनी प्रोत्साहन दिलं. मी त्यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. तुम्ही अशाच प्रकारे पांठिबा देत रहा. मी अखेरपर्यंत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
जडेजाची कामगिरी
न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये रविंद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. जडेजाने बॉलिंग करताना 1 विकेट घेतली. तर अफलातून कॅच आणि 1 रनआऊट देखील केला. तर 77 रनची झुंजार खेळी केली.
जडेजाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अवघ्या 2 मॅच खेळण्याची संधी मिळाली. त्याने या 2 मॅचमध्ये टीम इंडियासाठी तब्बल 41 रन फिल्डिंग दरम्यान वाचवले.