अहंकारी म्हणणाऱ्या कपिल देव यांना रवींद्र जाडेजाने दिलं उत्तर, म्हणाला `माजी खेळाडू आहात म्हणून...`
Ravindra Jadeja on Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. पैशासह अहंकारही येतो अशा शब्दांत कपिल देव यांनी फटकारलं आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेला भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) उत्तर दिलं आहे.
Ravindra Jadeja on Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाची आयसीसी (ICC) स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरी पाहता माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी खडे बोल सुनावले आहेत. वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर कपिल देव यांनी केलेल्या टीकेची सध्या चर्चा सुरु आहे. 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार राहिलेल्या कपिल देव यांनी आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशामुळे खेळाडूंमध्ये अहंकार निर्माण होत असल्याचं सांगितलं. दरम्यान रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) हे आरोप फेटाळले असून, भारतीय संघात अजिबात गर्व नसल्याचं म्हटलं आहे.
कपिल देव यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता रवींद्र जाडेजाने सांगितलं की, "त्यांनी हे विधान कधी केलं याची मला कल्पना नाही. मी सोशल मीडियावर अशा गोष्टी शोधत नाही. प्रत्येकाला आपलं मत असतं. माजी खेळाडूंनी आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण भारतीय संघात अहंकार आहे असं मला अजिबात वाटत नाही".
IND vs WI: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हतबल विराट कोहली संतापला, VIDEO व्हायरल
कपिल देव यांनी The Week ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "खूप सारा पैसा आल्यानंतर अंहकारही येतो. या खेळाडूंना आपल्याला सर्व काही माहिती आहे असं वाटतं". कपिल देव यांच्या टीकेमुळे भारतीय संघाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान रवींद्र जाडेजाने खेळाडूंना संघासाठी फक्त चांगली कामगिरी करण्याची इच्छा असून, कोणाचाही पर्सनल अजेंडा नाही असं स्पष्ट केलं आहे.
"प्रत्येकजण आपल्या खेळाचा आनंद लुटत असून, प्रत्येकजण मेहनती आहे. कोणीही कोणतीही गोष्ट गृहित धरलेली नाही. ते आपलं 100 टक्के देत आहेत," असं रवींद्र जाडेजाने सांगितलं आहे.
"भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर अशा कमेंट येणं साहजिक आहे. हा एक चांगल्या खेळाडूंचा गट आहे. आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत असून, कोणाचाही पर्सनल अजेंडा नाही," असं रवींद्र जाडेजाने म्हटलं आहे.
भारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं
वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने काही प्रयोग केले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. तसंच हार्दिककजे नेतृत्व सोपवण्यात आलं. पण भारताचा अत्यंत दारुण पराभव झाल्याने टीका होत आहे. तिसऱ्या सामन्यातही भारत संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.
कपिल देव नेमकं काय म्हणाले?
कपिल देव यांनी 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "मतभेद सर्वांमध्ये असतात, मात्र या खेळाडूंमध्ये एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. पण नकारात्मक बाब म्हणजे त्यांना सर्व काही माहिती आहे". ते म्हणाले की "या गोष्टी नेमक्या कशा पद्दतीने सुधारता येतील हे मी सांगू शकत नाही. पण त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. त्यांना असं वाटतं की, आपल्याला कोणालाही कोणतीच गोष्ट विचारण्याची गरज नाही. पण मला नेहमी वाटतं की, एक अनुभवी व्यक्ती नेहमी तुम्हाला मदत करु शकतो".
कपिल देव यांनी यावेळी पैशासह अहंकारही येतो असं सांगितलं. काही खेळाडू असे आहेत, ज्यांचा गर्व त्यांना सुनील गावसकरांसारख्या दिग्गज खेळाडूचा सल्ला घेण्यापासून रोखतो अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले "अनेकदा असं होतं की, जास्त पैसे आल्यास सोबत अहंकारही येतो. या क्रिकेटर्सना आपल्याला सर्व काही येतं असं वाटतं. यामध्ये फार अंतर आहे".
"हे असे क्रिकेटर्स आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. तिथे सुनील गावसकर असताना तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही? अहंकार कशाला? असा अहंकार कुठेच नाही. त्यांना आपण फार चांगले खेळाडू आहोत असं वाटतं. ते कदाचित चांगले असतीलही, पण 50 सीझन क्रिकेट पाहणाऱ्या व्यक्तीचीही मदत घेतली पाहिजे. कधीकधी एखाद्यायाल ऐकल्यानंतरही आपले विचार बदलू शकतात," असं कपिल देव यांनी सांगितलं.