मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना सुरू आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिला डाव 574 धावांवर घोषित केला. मात्र यावेळी रविंद्र जडेजा 175 रन्सवर नाबाद खेळत होता. जडेजा डबल सेंच्युरीच्या जवळ असताना रोहित शर्माने डाव घोषित केल्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावर आता रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा डाव घोषित केल्यानंतर टीम मॅनेजमेंटवर प्रश्न उपस्थित केले जातायत. चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे जडेजाला डबल सेंच्युरी मारायची संधी द्यायला हवी होती. दरम्यान यावर पडदा घालण्याचं काम रविंद्र जडेजाने केलं आहे.


मीच डाव घोषित करण्याचा संदेश पाठवला असल्याचं वक्तव्य जडेजाने केलं आहे. 


दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजा म्हणाला, "रोहित शर्माने कुलदीपद्वारे मला 200 रन्स करण्याचा मेसेज पाठवला होता. ज्यानंतर डाव घोषित केला जाणार होता. मात्र मी यासाठी नकार दिला. जर आम्ही थकलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना चहाच्या पहिलं खेळायला दिलं तर आम्हाला विकेट्स मिळतील हा विचार मी केला."


मी माझं हे शतक माझ्या पत्नीच्या भावाला देऊ इच्छितो. त्याने मला अनेकदा शतकी खेळी खेळण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे मी त्याला हे शतक डेडिकेट करतो, असंही जडेजा म्हणाला.


टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक नाबाद 175 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने जड्डू 175 धावांवर असताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव घोषित केला. रोहितच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.