रवींद्र जडेजाचा खास `क्रिकेट बंगला` पाहिला का ?
रवींद्र जडेजा आपल्या अंडर कंस्ट्रक्शन `क्रिकेट बंगल्या`च्या देखरेखीत व्यस्त आहे. त्याने इंस्टाग्रामवर या बंगल्याचा फोटो पोस्ट करत त्यावर काही ओळी लिहिल्या आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसत नाहीए. दरम्यान तो आपल्या अंडर कंस्ट्रक्शन 'क्रिकेट बंगल्या'च्या देखरेखीत व्यस्त आहे.
त्याने इंस्टाग्रामवर या बंगल्याचा फोटो पोस्ट करत त्यावर काही ओळी लिहिल्या आहेत.
'क्रिकेट बंगला तयार होतोय, होम स्वीट होम, पीस, राजपूत बॉय' या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बंगल्याच्या नावावरूनच आपण अंदाज लावू शकतो की, हा क्रिकेटच्या थीमवर आधारित आहे. याच्या इंटेरिअरमध्येही क्रिककेटशी संबंधीत जोडलेले सामान वापरले जाणार आहे.
कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल याचे प्रदर्शन दिवसेंदिवस चांगले होत आहे. त्यामूळ रवींद्र जडेजा सध्या तरी टीम बाहेर आहे.
६ चेंडूवर६ षटकार
दरम्यान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जामनग आणि अमरेलीदरम्यान झालेल्या टी-२० सामन्यात सर जडेजाने जबरदस्त प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
जामनगरकडून खेळणाऱ्या जडेजाने एका षटकांत सहा षटकार ठोकले. इतकंच नव्हे तर ६९ चेंडूत त्याने १५४ धावा तडकावल्या. जडेजाने १०व्या ओव्हरमध्ये खेळण्यास सुरुवात केली. १५व्या षटकांत त्याने ६ चेंडूवर ६ षटकार ठोकले.
दमदार प्रदर्शन करताना त्याने १० षटकार आणि १५ चौकारांच्या जोरावर १५४ धावा चोपल्या.
अमरेली संघासमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान होते. हे आव्हान अमरेली संघाला पूर्ण करता आले नाही आणि ५ विकेट गमावत ११८ धावांवर त्यांचा डाव आटोपला. जडेजाच्या १५४ धावांच्या जोरावर जामनगर संघाला विजय मिळवता आला.