मुंबई : आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या या टीमने विजेतेपद पटकावल्याने गुजरात टायटन्सची एकचं चर्चा होती. मात्र या विजेतेपदासह आणखीण एक गोष्ट खुप चर्चेत होती, ती म्हणजे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)  आणि चेन्नई सुपरकिंग्जमधला (Chennai super king)  वाद. आयपीएल संपल्यानंतर या वादावर पडदा पडण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप तरी या वादावर पडदा पडला नाही आहे. त्यामुळे नेमका रविंद्र जडेजा  (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये (Chennai super king) काय वाद झाला होता तो जाणून घेऊय़ात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 चा हंगाम चेन्नईसाठी (Chennai super king) सर्वांत वाईट होता. सर्वप्रथम महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपद सोडलं, रविंद्र जडेजाने कर्णधार पदाची धुरा हाती घेतली.मात्र चेन्नईला अपेक्षित विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. त्याची स्वत:ची फलंदाजी देखील चालत नव्हती. त्यामुळे तो टिकेचा धनी ठरत होता. अखेर टीम मॅनेजमेंटने जडेजाकडून कर्णधारपद काढून घेतलं. यानंतर अचानक तो जखमी झाल्याचे वृत्त आले आणि अचानक तो संघातून बाहेर झाला. त्यानंतर टीम मॅनेजमेंट आणि जडेजामध्ये वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.  


या निर्णयानंतर चेन्नई सोडण्याची चर्चा 
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 2012 पासून चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super king) संघाचा भाग आहे. जडेजाला आयपीएल 2022 पूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु आयपीएलच्या मध्यावर त्याच्याकडून कर्णधारपद हिसकावून एमएस धोनीकडे (ms dhoni) सोपवण्यात आले होते. वृत्तानुसार, तेव्हापासून जडेजाने संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता बातम्या येत आहेत की मे महिन्यात आयपीएल संपल्यापासून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व्यवस्थापनाच्या संपर्कात नाही. परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर जडेजा एनसीएमध्ये पुनर्वसनासाठी गेला आहे, परंतु यादरम्यान त्याने सीएसकेशी कोणताही संपर्क साधला नाही.


चेन्नईच्या पोस्ट काढल्या 
रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून संघाच्या 2021 आणि 2022 हंगामाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या होत्या. यामुळे असे मानले जात आहे की जडेजा आयपीएल 2023 पूर्वी सीएसकेपासून वेगळे होऊ शकतो.अलीकडे, त्याने फ्रँचायझीच्या एका पोस्टवरून आपली कमेंट देखील हटवली होती. ज्यामध्ये त्याने पुढील 10 वर्षे CSK शी संबंधित असण्याबद्दल सांगितले होते. जडेजा आणि CSK यांनीही खुप आधीच एकमेकांना अनफॉलो केले आहे. या सर्व घटनानंतर रविंद्र जडेजा चेन्नईची साथ सोडणार असल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्या आहेत.  


जडेजाची कामगिरी 
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आयपीएल 2022 च्या 10 सामन्यांमध्ये 20 च्या सरासरीने केवळ 116 धावा करू शकला. तो 7.51 च्या इकॉनॉमी रेटने फक्त पाच विकेट घेऊ शकला. जडेजाने 8 सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते, त्यापैकी फक्त 2 सामने जिंकले होते, उर्वरित 6 सामने पराभूत झाले होते.


दरम्यान रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील वाद काही मिटण्याचा नाव घेत नाही आहे. हा वाद असाच सुरु आहे.आता या वादावर कसा पडदा पडतो कि जडेजा चेन्नईची साथ सोडतो, हे येणाऱ्या काळात कळणार आहे.