RCB Fined For Slow Over Rate: थरारक असा सामना, कॅप्टनने फिल्डिंग थर्डी यार्डच्या जवळ आणली, लखनऊला सामना जिंकण्यासाठी पाहिजे होती, 1 बॉलवर 1 धाव... हर्षल पटेलने (Harshal Patel) आऊटसाईड ऑफ यॉर्कर केला. स्ट्राईकवर असलेल्या आवेशने आणि नॉन स्टाईकवर असलेल्या बिश्नोईने पापणी लवण्याच्या आत धाव पूर्ण केली. मागे किपिंग करत असलेल्या दिनेश कार्तिकने (DK) चूक केली म्हणा, पण तसंही थ्रो झाला नसता. थरारक सामन्यात अखेर लखनऊने आयसीबीला 1 गडी राखून पराभव केलाय. मात्र, या सामन्यात आयसीबीला (RCB) डबल फटका बसल्याचं पहायला मिळालंय. हाताशी आलेला सामना गमावला हा पहिला धक्का होताच, त्याचबरोबर कॅप्टन फाफ डुप्लेसिसला (Faf du Plessis) देखील मोठा फटका बसला आहे.


कॅप्टन फाफ डुप्लेसिसला 12 लाख रुपयांचा दंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डू प्लेसिसला (Faf du Plessis) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) ठेवल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याला 12 लाख रुपयांचा (12 lack) दंड ठोठावण्यात आला आहे. (RCB Captain Faf du Plessis fined 12 lakhs for slow over rate against Lucknow Super Giants as per IPL Code of Conduct)


आयपीएलने (IPL Official) एक अधिकृत निवेदन जारी केलं. त्यात त्यांनी कर्णधार फाफ डू प्लेसिसला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दिली. आयपीएल आचारसंहितेच्या (IPL Code of Conduct) अंतर्गत किमान ओव्हर-रेटमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. किमान ओव्हर रेट संबंधित हा संघाचा हंगामातील पहिला गुन्हा होता. तर आवेश खानवर (Avesh Khan) देखील आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता.


आणखी वाचा - RCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!


दरम्यान, लखनऊ सुपरजायंट्सच्या आवेश खानला आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आलं आहे. आवेशने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली दिलीये. मात्र, लेवल एकच्या गुन्हासंबंधी फक्त मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो. आवेशवर कोणत्याही प्रकारचा दंड लावण्यात आला नाही. त्याला वॉर्निंग मात्र देण्यात आली आहे.