IPL 2022: RCB कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसवर आयपीएलच्या एका सिझनची बंदी?
आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसच्या एका निर्णयामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय.
मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये अखेर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने वियजाचं खातं उघडलं. केकेआर विरूद्ध झालेल्या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. स्लो स्कोरिंगवर रखडलेला हा सामना अखेर दिनेश कार्तिकने एक चौकार आणि सिक्स मारत जिंकून दिला. मात्र या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसच्या एका निर्णयामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय.
या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वांसमोर स्वतःची खिल्ली उडवून घेतली. क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू त्याने घेतला. फाफ डू प्लेसिसच्या निर्णयाची सोशल मीडियावर चेष्टा करण्यात येतेय. यानंतर एका यूजरने , त्याच्यावर संपूर्ण सीझनसाठी बंदी घालण्यात यावी, असं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
कोलकात्याच्या डावात 16व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने योग्य पद्धतीने बचाव केला. बॉल त्याच्या बॅटच्या मधोमध आदळला. यावेळी गोलंदाज हर्षलला वाटलं की, चेंडू पहिल्या पॅडला लागला. त्याने अपील केलं, जे अंपायरने फेटाळलं. याचवरून डु प्लेसिसने डीआरएस घेतला.
रिव्ह्यूसाठी अपील केल्यावर, थर्ड अंपायरने रिप्लेमध्ये पाहिलं की बॉल पॅडच्या आसपासही नव्हता. यांतर थर्ड अंपायरनेही फलंदाज वरुणला नाबाद करार दिला. या सर्व घटनेनंतर रिव्ह्यूचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. तर चाहते आरसीबी टीम आणि डु प्लेसिसला प्रचंड ट्रोल करू लागले.
सोशल मीडियावर एका यूजरने लिहिलंय की, हा डीआरएस घेतल्यानंतर फाफ डू प्लेसिसवर संपूर्ण सिझनसाठी बंदी घालण्यात यावी. तर दुसर्या यूजरने म्हटलंय की, RCB DRS चा वापर असा करतोय जसं मी माझ्या वडिलांचे पैसे वापरतो.