RCB फॅन्सचा पारा चढला, शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ, नको ते बोलले अन्...
Shubhman Gill Sister: शुभमनच्या झुंजावती शतकासमोर विराटचं शतक फिक्कं पडलं. शुभमनच्या या शतकामुळे (Shubhman Gill Century) तो खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्ससाठी हिरो ठरलाय. तर आरसीबी (RCB) फॅन्ससाठी व्हिलन. अशातच शिभमन गिलच्या बहिणीला देखील शिवीगाळ झाल्याचं दिसून आलं.
GT vs RCB IPL 2023: इंडियन प्रमियर लीग 2023 च्या अंतिम सामन्यांचा थरार आता सुरू झाला आहे. अखेरच्या लीग सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) याच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB vs GT) धुव्वा उडवला. गुजरातने बंगळुरूविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवून मुंबईला प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) प्रवेश करून दिला आहे. या सामन्यात किंग कोहलीने देखील शतक ठोकलं होतं. मात्र, शुभमनच्या झुंजावती शतकासमोर विराटचं शतक फिक्कं पडलं. शुभमनच्या या शतकामुळे तो खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्ससाठी हिरो ठरलाय. तर आरसीबी फॅन्ससाठी व्हिलन.
बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिलने 52 बॉलमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची खेळी केली. अखेरच्या बॉलवर सिक्स खेचत त्याने आरसीबीच्या 15 वर्षाच्या प्रतिक्षेचा चुराडा केलाय. चिन्नास्वामी स्टेडियमवर एकच शांतता पसरली होती. लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचं दिसून आलं. एवढंच काय तर लोकं आरसीबीच्या अभिवादनासाठी देखील थांबली नाहीत. दर दुसरीकडे सोशल मीडियावर शुभमन गिलवर टीका होताना दिसली.
सोशल मीडियावर आरसीबीच्या चाहत्यांनी शुभमन गिलवर टीका करत शिवीगाळ केल्याचं दिसून आलं. त्यावेळी शिभमन गिलच्या बहिणीला देखील शिवीगाळ झाल्याचं दिसून आलं. लाडक्या भावाच्या खेळीवर बहिण शाहनीलने पोस्ट केली होती. त्यावेळी तिच्या पोस्टवर चाहत्यांनी अश्लिल शब्दांचा वर्षाव केला. अश्लिल भाषेत केलेल्या कमेंट्स वाचून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
दरम्यान, मोक्याच्या क्षणी शुभमनने आक्रमक फलंदाजी करत आरसीबीला घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे सोशल मीडियावर साराच्या नावाने अनेकांनी शिभमनवर टीकास्त्र सोडलंय. सामन्यात झालेल्या पराभवानंतर अनेकांचे चेहरे उतरले होते. मात्र, शुभमन आणि विराट यांच्यात चांगली चर्चा झाल्याचं दिसून आलं होतं. दोन्ही खेळाडूंनी खिळाडूवृत्ती दाखवली. फॅन्स मात्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.